विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघातात भरधाव कारने उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. 3 friends died on the spot
उसाच्या ट्रॉलीला पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात घडला आहे.राहुल सुरेश आळेकर (वय २२ रा. श्रीगोंदा), केशव सायकर (वय २२ रा. काष्टी) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८ रा. श्रीगोंदा), अशी त्या तीन मित्रांची नावं आहेत.
मृत राहुल आणि आकाश हे दोघं आपला मित्र केशव सायकर याला त्याच्या गावी काष्टी याठिकाणी सोडवण्यासाठी जात होते. रात्री एकच्या सुमारास हॉटेल अनन्यासमोरून जात असताना चालकाला समोर असणाऱ्या ट्रॉलीचा अंदाज आला नाही.
तसेच कारचा वेगही अधिक असल्याने कारची उसाच्या ट्रॉलीस पाठीमागून जोरदार धडक बसली आहे. हा अपघात इतका भीषण होता, की या अपघातात कारमधील तिघेही जागीच ठार झाले आहेत. तसेच कारचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे.
3 friends died on the spot
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातून एक कोटी डिजिटल सदस्य नोंदणीचे लक्ष्य गाठा; एच. के. पाटील यांचे आवाहन
- कर्नाटकात प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी अहवालाची आवश्यकता नाही; बंधन उठविले
- गोव्याच्या राजकारणात खंजीराचा खणखणाट; पण पवारांचा नव्हे, मग कोणाचा??
- दिल्ली – लंडन बससेवेला लवकरच सुरुवात, भाडे १५ लाख; तब्बल ७० दिवसांचा प्रवास
- तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही घटला
- मनरेगाच्या कामाचा योग्य दाम कसा मिळेल यावर चर्चा ; किसान सभा, श्रमिक व प्रशासन यांची विशेष बैठक