• Download App
    मुंबईनंतर ठाण्यातही परमबीर सिंहांविरोधात FIR दाखल, 2 कोटींच्या हप्ता वसुलीचा आरोप । 2nd extortion case filed against ex-Mumbai top cop Param Bir Singh In Thane

    मुंबईनंतर ठाण्यातही परमबीर सिंहांविरोधात FIR दाखल, 2 कोटींच्या हप्ता वसुलीचा आरोप

    Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. गुरुवारी सिंह यांच्या विरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सिंह यांच्यासह 6 जणांविरुद्ध मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरात आता एफआयआर नोंदविण्यात आली आहे. 2nd extortion case filed against ex-Mumbai top cop Param Bir Singh In Thane


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. गुरुवारी सिंह यांच्या विरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सिंह यांच्यासह 6 जणांविरुद्ध मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरात आता एफआयआर नोंदविण्यात आली आहे. ठाणे शहरातील बिल्डर शरद अग्रवाल यांनी परमबीर यांच्यावर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

    मुंबईतही एफआयआर

    परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरुद्ध मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये परमबीर सिंह यांच्याव्यतिरिक्त पाच अन्य पोलीस आणि दोन नागरिकही सहभागी आहेत. सिंह यांच्याशिवाय गुन्हे शाखेचे डीसीपी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

    सध्या पोलिसांनी दोन्ही नागरिकांना अटक केली असून त्यांची नावे सुनील जैन व पुनमिया अशी सांगितली जात आहेत. या सर्व पोलीस अधिकारी आणि नागरिकांविरोधात बिल्डर श्याम सुंदर अग्रवाल यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भादंवि कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468 आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अनिल देशमुखांवर केले होते आरोप

    परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांमार्फत 100 कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सीबीआय आणि ईडी दोन्ही संस्था अनिल देशमुखांविरोधात चौकशी करत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख, त्यांची पत्नी व मुले यांनाही ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास व जबाब नोंदविण्यास सांगितले. मात्र, अद्याप देशमुख कुटुंबातील कोणीही ईडी कार्यालयात गेलेले नाही.

    शासकीय निवासस्थानाच्या वापरासाठी दंड

    2018 ते 2018 दरम्यान बदली होऊनही परमबीर सिंग यांनी सरकारी निवासस्थानावर कब्जा ठेवलेला होता. यामुळे सरकारने त्यांच्यावर 24 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. परमबीर सिंग यांच्यावर दोन सरकारी निवासस्थाने वापरल्याचा आरोप आहे. ठाणे शहरातील पोलिस आयुक्त असताना ते एकाचवेळी दोन शासकीय निवासस्थानांचा वापर करत होते. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध सन 2018 मध्ये 54 लाख 10 हजार 545 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी त्यांनी 29 लाख 43 हजार रुपये भरले होते. त्यानंतर सिंग मलबार हिलमधील नीलिमा अपार्टमेंटमध्ये राहत होते.

    2nd extortion case filed against ex-Mumbai top cop Param Bir Singh In Thane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य