• Download App
    महाविकास आघाडीचे २५ आमदार भाजपाच्या संपर्कात, रावसाहेब दानवे यांचा दावा|25 MLAs of Mahavikas Aghadi in touch with BJP, claims Raosaheb Danve

    महाविकास आघाडीचे २५ आमदार भाजपाच्या संपर्कात, रावसाहेब दानवे यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    जालना : महाविकास आघाडीचे २५ आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते कसेबसे सावरले. पण अजूनही ते भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.25 MLAs of Mahavikas Aghadi in touch with BJP, claims Raosaheb Danve

    दानवे म्हणाले, निवडणुका येऊ द्या, एक-एक करुन सगळे भाजपच्या वाघोलीत येऊन पडतील. हे आमदार कोण आहेत असा प्रश्न विचारला असता, जे आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं आता सांगू शकत नाही. कारण, त्यांची आमदारकी धोक्यात येईल असेही त्यांनी सांगितले.



    निवडणुकांच्या तोंडावर हे नाराज आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्तही ठरला असल्याचे दानवेंनी स्पष्ट केलं.विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर महाविकास आघाडीचे २५ आमदार नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या आमदारांचा समावेश होता.

    राज्यातील निधीवाटपात राष्ट्रवादी कॉँग्रेसला सर्वाधिक वाटा मिळत असताना शिवसेनेच्या आमदारांना मात्र निधीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या आमदारांची भेट घेऊन समजूत काढली होती. त्यामुळे या आमदारांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची अस्वस्थता अद्यापही कायम आहे.

    25 MLAs of Mahavikas Aghadi in touch with BJP, claims Raosaheb Danve

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा