• Download App
    महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात, निवडणूकीत एक - एक आमदार भाजपच्या वाघोरीत येईल - रावसाहेब दानवे 25 MLAs of Mahavikas Aghadi are in touch with us

    महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात, निवडणूकीत एक – एक आमदार भाजपच्या वाघोरीत येईल – रावसाहेब दानवे

    प्रतिनिधी

    जालना : महाविकास आघाडीचेच 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते सावरले. एकदा निवडणुका येऊ द्या, एक एक आमदार भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील. महाविकास आघाडीचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक स्फोट केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केला. रावसाहेब दानवे यांनी वाढदिवस आणि धुळवड आज साजरी केली. त्यावेळी त्यांनी “एबीपी माझा”शी बोलताना हा दावा केला आहे. 25 MLAs of Mahavikas Aghadi are in touch with us

    – शिवसेना आमदार बंडाच्या पवित्र्यात

    पण त्यामुळे शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. कारण निधी वाटपात अर्थमंत्री अजित पवार शिवसेना आमदारांवर अन्याय करत असल्याचा आरोप करून शिवसेनेचे 25 आमदार बंडाच्या पवित्र्यात आहेत.

    – नावे सांगणार नाही

    भाजपचे आमदार राष्ट्रवादी जातील, अशा बातम्या पेरल्या जात आहेत. पण ज्यांची मौत आलीय, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाहीत ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील, खोदता खोदता त्यांच्याच अंगावर न पडो, अशीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. महाविकास आघाडीचेच आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही असेही ते म्हणाले.

    – शिवसेनेने आता हिरवा पांघरले

    रावसाहेब दानवे म्हणाले की, “ज्या दिवशी शिवसेनेने आम्हाला सोडले आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. त्यांनी आता हिरवं पांघरून घेतलंय आणि आता हिरव्याचं समर्थन करतात. आज राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी ते भगवा-भगवा करतात. भेसळ आमच्यात आहे का त्यांच्यात त्यांनी पाहावं. भेसळ दोन-तीन एकत्र आले की भेसळ होत असते.”

    – दाऊदशी मनी लॉन्ड्रिंग

    रावसाहेब दानवे पुढे म्हणाली की, “दाऊद इब्राहिमसारख्या बॉम्ब स्फोटातील आरोपीच्या पाठीमागे उभा राहणारा, त्याच्याशी मनी लॉन्ड्रिंग करणारा मंत्री जेलमध्ये गेला. तरीही त्यांचा राजीनामा न घेणाऱ्या महाविकास आघाडीची अरेरावी राज्यातील जनतेला सहन होणार नाही. भगवाधारी सगळे फक्त आमच्याकडेच आहेत.

    – अब्दुल सत्तार यांची शिवसेना

    आम्ही पाठीत वार कधी केला नाही तर यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झालीय अशीही त्यांनी टीका केली.

    25 MLAs of Mahavikas Aghadi are in touch with us

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस