• Download App
    खळबळजनक : नांदेडच्या रुग्णालयात मागील २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू; १२ नवजात बालकांचाही समावेश! 24 patients died in last 24 hours in Nanded hospital Including 12 newborns

    खळबळजनक : नांदेडच्या रुग्णालयात मागील २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू; १२ नवजात बालकांचाही समावेश!

    जाणून घ्या, रूग्णालयाच्या डीनचे काय आहे म्हणणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी काय दिली आहे प्रतिक्रिया?

    विशेष प्रतिनिधी 

    नांदेड : येथील सरकारी रुग्णालयात मागील २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अहवालानुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासाठी लोक कमकुवत सरकारी यंत्रणेला दोष देत आहेत. यापूर्वी ठाण्यातील रुग्णालयात एकाच दिवसात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. 24 patients died in last 24 hours in Nanded hospital Including 12 newborns

    नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे डीन म्हणाले, “गेल्या २४ तासांत झालेल्या २४ मृत्यूंपैकी १२ प्रौढांचा मृत्यू हा विविध आजारांमुळे आणि बहुतांशी साप चावल्यामुळे झाला आहे.” ते म्हणाले, “गेल्या २४  तासांत १२ अर्भकांचाही मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६ मुले आणि ६ मुली आहेत. वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे आम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागले.”

    पक्ष सोडून उभा राहिलो, तर डिपॉझिटही जाईल; फडणवीसांचे वक्तव्य; पण इशारा कोणाला??

    डीन म्हणाले, “आम्ही तृतीय स्तरावरील आरोग्य केंद्र आहोत. ७० ते ८० किलोमीटरच्या परिघात एकच रुग्णालय आहे. त्यामुळे रुग्ण दूरवरून उपचारासाठी येतात. काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढली आहे. समस्या निर्माण झाल्या आहेत.” डीन म्हणाले, “हाफकिन नावाची एक संस्था आहे. आम्ही त्यांच्याकडून औषधे खरेदी करणार होतो, पण तेही झाले नाही. मात्र आम्ही स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करून रुग्णांना पुरवली.”

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मृत्यूंना दुर्दैवी म्हटले आहे. रूग्णालयात काय झाले याबाबत अधिक माहिती घेतली जाईल आणि कारवाई केली जाईल, असे त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    24 patients died in last 24 hours in Nanded hospital Including 12 newborns

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल