Tuesday, 13 May 2025
  • Download App
    वर्धापनदिन राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा; मुलाखती महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांच्या। 22 nd anniversary of NCP; jayant patil interview

    वर्धापनदिन राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा; मुलाखती महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांच्या

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आज १० जून २०२१ – राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा २२ वा वर्धापन दिन. गेली २२ वर्षे शरद पवार यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद. स्थापनेच्या वेळचे पी. ए. संगमा आज हयात नाहीत. तारिक अन्वर राष्ट्रवादी सोडून परत काँग्रेसमध्ये गेले आहेत. 22 nd anniversary of NCP; jayant patil interview

    -राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात २२ वर्षांपैकी पैकी फक्त ५ वर्षे सत्तेबाहेर राहिली. १७ वर्षे सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. सुरूवातीपासून शरद पवारांपाठोपाठ अजित पवार हे सर्वाधिक प्रभावी नेते मानले गेले. -मात्र, सध्या खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाची किंबहुना मुख्यमंत्रीपदाची जोरदार चर्चा.

    -पण राष्ट्रवादीच्या आजच्या वर्धापनदिनी या पैकी कोणीही नेत्याने मुलाखती दिलेल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मुलाखती राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विविध मराठी वाहिन्यांना देत आहेत.



    -शरद पवार यांच्यानंतर तुमच्या पाठोपाठ अजित पवार की सुप्रिया सुळे…??, हा प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले, “शरद पवार हे राष्ट्रवादीचे एकमेव नेते असून आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली एकदिलाने काम करीत आहोत. त्यामुळे क्रमांकाने काम करण्याची गरज नाही”.

    -राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद न मिळाल्याच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, “राजकीय परिस्थितीप्रमाणे तडजोड करणे आवश्यक असते. २००४ मध्ये राष्ट्रवादीला विधानसभा निवडणूकीत ७२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने त्यावेळी घेतला. त्यावेळी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद घेतले असते तर आज पक्षाची परिस्थिती चांगली झाली असती असे आजही वाटते”.

    22 nd anniversary of NCP; jayant patil interview

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस