22 covid patients dead bodies stuffed in an ambulance : जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून तब्बल 22 मृतदेह कोंबून नेण्यात आले. या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एकाच वाहनात असे मृतदेह कोंबल्यावरून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एक रुग्णवाहिकेत कोंबण्यात आले. 22 मृतदेहांना स्मशानभूमीकडे नेण्यासाठी एकाच रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत्युनंतरही कोरोनाबाधितांच्या वाट्याला अवहेलना आल्याने रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात टीकेची झोड उठली आहे. 22 covid patients dead bodies stuffed in an ambulance for Funeral in Ambajogai Beed
विशेष प्रतिनिधी
बीड : जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून तब्बल 22 मृतदेह कोंबून नेण्यात आले. या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एकाच वाहनात असे मृतदेह कोंबल्यावरून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
काय आहे घटना?
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एक रुग्णवाहिकेत कोंबण्यात आले. 22 मृतदेहांना स्मशानभूमीकडे नेण्यासाठी एकाच रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत्युनंतरही कोरोनाबाधितांच्या वाट्याला अवहेलना आल्याने रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात टीकेची झोड उठली आहे. रविवारी हा धक्कादायक घटना उघडकीस आली. यावर रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे की, रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने एकावर एक टाकून मृतदेह न्यावे लागले.
स्वारातीमध्ये फक्त दोनच रुग्णवाहिका
अंबाजोगाच्या स्वाराती रुग्णालयात केवळ दोनच रुग्णवाहिका आहेत. कोरोनामुळे संकट वाढलेलं असताना आणखी 5 रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली होती. याबाबत मार्च महिन्यात जिल्हा प्रशासनाला पत्रही पाठवण्यात आलं होतं. परंतु, अद्यापही रुग्णवाहिका मिळाली नसल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. रुग्णवाहिकेअभावी सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कोरोना संसर्गामुळे बीडसह अंबाजोगाईत भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अंबाजोगाइच्या शासकीय रुग्णालयात इतर तालुक्यांतूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत आहेत. रुग्णसंख्येबरोबरच मृतांची संख्याही चिंता वाढवणारी आहे.
22 covid patients dead bodies stuffed in an ambulance for Funeral in Ambajogai Beed
महत्त्वाच्या बातम्या
- मूर्तिमंत त्याग : नागपुरात ८५ वर्षांचे संघ स्वयंसेवक दाभाडकरांनी तरुणाचा जीव वाचविण्यासाठी दिला स्वतःचा बेड
- आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून रेमडेसिव्हिरप्रकरणी सुजय विखेंचे समर्थन, मग फडणवीस-दरेकरांचं चुकलं तरी काय?
- निवडणूक निकालानंतर मिरवणुकीवर बंदी, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर निवडणूक आयोगाची कठोर भूमिका, वाचा सविस्तर…
- कोरोनाची लाट ओसरतेय! : देशात 24 तासांत सर्वाधिक 2.48 लाख कोरोना रुग्ण बरे झाले, सक्रिय रुग्णांतही फक्त 67 हजारांची वाढ
- ‘मेक द डिफरंस’ : प्रमोद सावंत म्हणजे पर्रिकरांचा ‘ लंबी रेस का घोड़ा’ …गोव्याचे डॉक्टर जेव्हा मुख्यमंत्री होतात आणि मुख्यमंत्री जेव्हा डॉक्टर होतात !