प्रतिनिधी
मुंबई : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे आता एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपादरम्यान पगारासाठी 4 वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे, तसेच कित्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे सरकारने मान्य केले होते. 2023 Halfway through January, Salary of ST Employees Stalled; Aggressive organization
मात्र ते पाळण्यात येत नसल्यामुळे 90 हजार कर्मचारी नाराज आहेत. यासंदर्भात एसटी संघटनेने महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करावी लागेल, अशी नोटीस बजावली आहे. सरकार अपुरा निधी देते. पण तो देखील वेळेवर देत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन लांबणीवर पडत असल्याचे कर्मचा-यांचे म्हणणे आहे.
कायदेशीर मार्गाने धडा शिकवू
एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 4 ते 10 तारखेदरम्यान पगार देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने न्यायालयात सांगितले होते. आता महिन्याची 12 तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने एसटी कर्मचा-यांचे पगार रखडले आहेत.
राज्य सरकार एसटी कर्माचा-यांशी दुजाभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला असून, सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवू, असा इशारा एसटी कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
2023 Halfway through January, Salary of ST Employees Stalled; Aggressive organization
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजलना हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली 10 वर्षांचा तुरुंगवास, 1 लाखाचा दंड
- संघ मुसलमानांना का घाबरतो?, मुसलमान फक्त समानता आणि समान नागरिकतेची बात करतात; असदुद्दीन ओवैसींचा दावा
- ईडी, इन्कम टॅक्स छाप्यांवेळी हसन मुश्रीफ खेळले मुस्लिम कार्ड; म्हणाले, नवाब मलिक, मुश्रीफ, अस्लम शेखांवरच कारवाई का?