वृत्तसंस्था
अमरावती : ऐन दिवाळीच्या तोंडावर तब्बल २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती शहराजवळील बडनेरा रेल्वे जंक्शन इथं गुडस वॅगन रिपेअर डेपो लाईनच्या कामानिमित्त रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होणार आहे. 20 trains canceled on Diwali; Decision to undertake repair work of Badnera Railway Depot in Amravati
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी रेल्वेने प्रवास करतात. मात्र याच काळात बडनेरा रेल्वे डेपोच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या गाड्या रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांना आता एसटी बसचा किंवा खासगी वाहतुकीचा उपयोग करावा लागणार आहेत.
कोणत्या रेल्वे गाड्या होणार रद्द?
ब्लॉकमुळे २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबर रोजी धावणारी मुंबई-अमरावती एक्सप्रेस, याच तारखेला धावणारी अमरावती-मुंबई एक्सप्रेस, २७ ऑक्टोबरची पुणे-अमरावती एक्सप्रेस, २८ ऑक्टोबरची अमरावती-पुणे एक्सप्रेस, २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबरची नागपूर- सीएसएमटी एक्सप्रेस, २९ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबरची सीएसएमटी-नागपूर एक्सप्रेस, २८ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरची सीएसएमटी-नागपूर एक्सप्रेस, २८ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरची नागपूर-सीएसएमटी एक्सप्रेस, ३० ऑक्टोबरची पुणे – नागपूर एक्सप्रेस, २९ ऑक्टोबरची नागपूर-पुणे एक्सप्रेस, २८ ऑक्टोबरची पुणे-नागपूर एक्सप्रेस आणि २९ ऑक्टोबरची नागपूर-पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
20 trains canceled on Diwali ; Decision to undertake repair work of Badnera Railway Depot in Amravati
महत्त्वाच्या बातम्या
- फर्जीवाडा ! आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईलने दाखवलेला तो ‘सॅमचा’ फोटो पालघर येथील व्यापारी हनिक बाफनाचा ; व्हाट्स ॲप डीपीचा दुरूपयोग;तक्रार दाखल ..
- SARDAR UDHAM SINGH : ‘सरदार उधम’ चित्रपट ब्रिटिशांबद्दल द्वेष पसरवणारा;अनपेक्षित कारण देत ऑस्करच्या यादीतून वगळलं ; भारतीय संतापले
- Jyotiraditya Scindia : राजघराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू ! केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली स्वच्छता..व्हिडिओ व्हायरल
- WHO द्वारे कोवॅक्सिनला मंजूरी नाही ; याबाबत अधिक माहिती विचारली , ३ नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल