प्रतिनिधी
मुंबई :महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा नागपूरात होत असताना प्रकाश आंबेडकरांनी त्या सभेला राजकीय फाऊल केला आहे. महाराष्ट्रात येत्या 15 दिवसांत 2 मोठे राजकीय बॉम्बस्फोट होतील, असा दावा त्यांनी केला आहे. 2 major political bomb blasts in 15 days; Prakash Ambedkar’s foul on Mahavikas Aghadi
सध्या महाराष्ट्रातील राजकारणात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार महाविकास आघाडीवर नाराज असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. येत्या १५ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा, प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पण त्या पलिकडे जाऊन ज्या प्रकाश आंबेडकरांनी अशा राजकीय बॉम्बस्फोटांचा दावा केला आहे, हे तेच प्रकाश आंबेडकर आहेत जे दोनच दिवसांपूर्वी तेलंगणात के. सी. चंद्रशेखर राव यांच्या रूपाने वंचित बहुजन आघाडीसाठी नवा मित्र शोधायला गेले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे महाविकास आघाडीत स्थान मिळत नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती केली तरी ती युती राजकीय दृष्ट्या क्लिक होईलच, याची गॅरंटी नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना नवा मित्र शोधणे भाग पडले आहे आणि म्हणूनच ते तेलंगणाची राजधानी हैदराबाद मध्ये जाऊन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना भेटले होते. आता त्यांना भेटून आल्यानंतर महाविकास आघाडीला राजकीय फाऊल करण्याच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकरांनी राजकीय बॉम्बस्फोटांचा दावा केला आहे.
सध्या महाराष्ट्रातील राजकारणात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार महाविकास आघाडीवर नाराज असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. येत्या १५ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा, प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमाला रविवारी, १६ एप्रिलला प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राज्यात सुरू असलेल्या राजकारणाविषयी विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, येत्या १५ दिवसांत बरंच मोठं राजकारण महाराष्ट्रात होईल. तेव्हा आपण १५ दिवसांची वाट पाहू या. दोन ठिकाणी मोठे बॉम्बस्फोट होतील. तसेच ठाकरे गटासोबत वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरू आहेत. त्यामुळे आमच्या युतीची काळजी करू नका, असा विरोधकांना आंबेडकरांनी टोला लगावला आहे.
जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासा केला. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, पुलवामाबाबत त्यावेळी ही मी बोललो होतो, जी गाडी ब्लास्ट केली. त्याला प्रोटेक्शन नव्हते. ही माहिती मला मिळते तर सरकारलाही मिळू शकते. पण सरकारला राजकारण करायच होते. 10 गाड्या कॅनॉव्हबद्दलची साधी बाब कॉन्स्टेबलला माहिती आहे, ती बाब यांना माहिती नसावी. यांची साधी चौकशी सुद्धा नाही. राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
2 major political bomb blasts in 15 days; Prakash Ambedkar’s foul on Mahavikas Aghadi
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : गँगस्टर अतिक अहमदच्या 44 वर्षांच्या गुन्ह्यांची कहाणी, दहशतीचा एका मिनिटात झाला अंत
- अतीकच्या हत्येने तुटला “तो” धागा; अतीक तपास यंत्रणांना देणार होता ISI – दहशतवादी गटांच्या nexus ची माहिती!!
- प्रयागराज मधील दहशतीचा अंत; अतीक अहमद, अशरफ अहमद यांची तिघांकडून निर्घृण हत्या; अतीक आयएसआय, लष्कर ए तैय्यबाशी संबंधी देणार होता माहिती!!
- BREAKING NEWS : माफिया डॉन अतिक अहमदची भाऊ अशरफसह गोळ्या झाडून हत्या!