वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात २५० मोठे, विशाल, अतिविशाल तसेच थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्पांना २०१९ ते आजतागायत देकार पत्र देण्यात आले आहे. त्या माध्यमातून २ लाख २५ हजार ४८१ कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसेच १ लाख ७७ हजार ४३४ एवढी रोजगारनिर्मिती होणार आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना केला. 2.25 lakh crore will be invested in Maharashtra: Ajit Pawar’s claim in reply to the discussion on the budget
ते म्हणाले की ऑक्टोबर, 2019 ते मार्च 2024 या काळात 5 लाख 32 हजार 429 कोटी थेट विदेशी रकमेची गुंतवणूक झाली आहे. त्यापैकी 2022-23 आणि 2023-24 या वर्षात राज्यात अनुक्रमे 1 लाख 18 हजार 422 कोटी आणि 1 लाख 25 हजार 101 कोटी परकीय गुंतवणूक झाली. ही देशाच्या एकूण परकीय गुंतवणुकीच्या 30 टक्के आहे. महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीमध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. दरम्यान, पवार यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने आज विरोधी पक्षाने सभात्याग केला. त्यानंतर वडेट्टीवार म्हणाले की, कृषी विभागासाठी झालेला खर्च हा मागील वर्षीच्या २०२३- २४ मध्ये एकूण तरतुदीच्या केवळ ४७ टक्के झालेला आहे. सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचे पाप या सरकारकडून होत आहे.
अल्पसंख्याकांसह सर्व समाजांना निधी मिळेल
पवार असेही म्हणाले की, अल्पसंख्याक समाजासह इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाला निधीची कुठेही कमतरता भासू दिली जाणार नाही. धनगर समाजाच्या आरक्षणात न्यायालयीन आडकाठी आलेली आहे. पण या समाजाला न्याय देण्यासाठी सरकारने आदिवासी समाजासाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतला असून त्याचीही अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. सर्वसमावेशक विकास हेच या सरकारचे धोरण आहे, असेही त्यांनी सांगितले.
2.25 lakh crore will be invested in Maharashtra: Ajit Pawar’s claim in reply to the discussion on the budget
महत्वाच्या बातम्या
- हेमंत सोरेन झारखंडचे 13 वे मुख्यमंत्री बनले; ज्या राजभवनात अटक केली, तिथेच 156 दिवसांनी घेतली शपथ
- टीम इंडियाला मिळाला असा सन्मान जो आजपर्यंत ना कोणत्या पंतप्रधानांना मिळा ना मुख्यमंत्र्यांना!
- हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ!
- अदानीचे शेअर्स विकत घेऊन जगणाऱ्या काँग्रेसने आम्हाला अदानी बद्दल विचारू नये’