• Download App
    राज्यातील शासकीय शाळेत पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पोषक वडी! | 1st to 8th standard children will get nutritional slice

    राज्यातील शासकीय शाळेत पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पोषक वडी!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता पोषण आहारामध्ये न्यूट्रिटिव्ह स्लाइस म्हणजेच पोषक वडी दिली जाणार आहे. राज्यातील शासकीय शाळांमध्ये ही नवी सुविधा सुरू केली जाणार आहे. ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी हे मुख्य घटक असलेल्या पाच प्रकारच्या वड्या दिल्या जाणार असून. राज्यातील सर्व शासकीय शाळांना या पोषण वडीचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    1st to 8th standard children will get nutritional slice

    पोषक वडी पुरवण्याचे ज्यांना कॉण्ट्रक्ट दिले जाणार आहे, अशा सर्व पुरवठादारानी पोषक वडीची मागणी केल्यापासून सात दिवसांच्या आत पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे पोषक वडयांचे वजन, त्यांचा दर्जा, प्रमाण याबाबत शाळेचे मुख्याध्यापक असमाधानी असतील तर त्यांना त्या वडय़ा बदलून देखील घेता येणार आहेत. तेव्हा पुरवठादाराने स्वखर्चाने इथे पोषक उड्या बदलून देणे बंधनकारक आहे. आणि असे न केल्यास तेवढि रक्कम  कपात करण्याची शिफारसही केली आहे. असे स्पष्ट करण्यात आले आहे.


    Maharashtra Schools : राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात Task Force चा मोठा इशारा …सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा नाहीच !


    पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आठवड्यातील पाच दिवस दररोज 50 ग्रॅमच्या चार बडय़ा तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी 45 ग्रॅमच्या सहा वडय़ा सेवन करणे आवश्यक आहे. याचसाठी हा पोषण शालेय पोषण आहार  योजनेअंतर्गत काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून पोषक वड्यांचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

    1st to 8th standard children will get nutritional slice

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस