वृत्तसंस्था
नवी दिल्ली – महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे महापूर, भूस्खलन यामुळे मोठ्या दुर्घटना घडल्यात. तेथील जनतेच्या मदतीसाठी NDRF च्या १८ टीम महाराष्ट्रात कार्यरत करण्यात आल्या आहेत. आणखी ८ टीम लवकरच पोहोचतील, अशी माहिती एनडीआरएफचे डीआयजी मोहसिन शाहिदी यांनी दिली आहे. 18 teams are currently deployed and 8 additional teams will be deployed in Maharashtra
अतिवृष्टी आणि भूस्खलनाचा सर्वाधिक प्रभाव रायगड जिल्ह्यात झाला आहे. तिथे एनडीआरएफने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. दुर्घटनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी सर्व अडथळे पार करून टीम पोहोचत आहेत.
सध्या महाराष्ट्रात एनडीआरएफच्या १८ टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत. आणखी ८ टीम लवकरात लवकर पोहोचतील, अशी माहिती मोहसिन शाहिदी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रतील टीम देखील घटनास्थळी कार्यरत आहेत. रायगड जिलह्यातील भूस्खलनाच्या ठिकाणाहून आतापर्यंत अनेक मृतदेह सापडले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एनडीआरएफची एक टीम मुंबईपासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर महाड येथे पोहोचली आहे आणि मदत आणि बचाव कार्यात व्यग्र आहे. आणखी दोन टीम लवकरच दाखल होतील.
अनेक भागांत पूर
दुसरीकडे, महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या लगतच्या किनारपट्टीच्या भागातील काही भागांत, विशेषत: रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पूर आला आहे. तो ओसरायला तयार नाही कोकण भागातील या दोन जिल्ह्यांतील अनेक ठिकाणे पाण्यामध्ये बुडाली आहेत आणि अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.
परंतु, पुराचे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावागावांमध्ये अजूनही साठलेले आहे, की प्रत्यक्ष तेथे पोहोचून लोकांना मदत करण्यात अडथळे येत आहेत. कोकणात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे. या पावसातही एनडीआरएफच्या टीम लोकांच्या मदत आणि बचाव कार्याची पराकाष्ठा करीत आहेत, असे मोहसिन शाहिदी यांनी स्पष्ट केले.
18 teams are currently deployed and 8 additional teams will be deployed in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : यावर्षी इयत्ता १ली ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- देश हळहळला : रायगड, सातारा, पोलादपूर भूस्खलनात मृतांची संख्या 72 वर, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक, जाहीर केली मदत
- UP Elections 2022 : 13 टक्के ब्राह्मण आणि 23 टक्के दलित एकत्र आले तर यूपीत बसपाचे सरकार, सतीश चंद्र मिश्रा यांचा विश्वास