• Download App
    पालकमंत्री नबाब मलिकांच्या गोंदिया जिल्ह्यात १५ रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; अपयश झाकण्यासाठीच मलिकांचे बेछूट आरोप; पडळकरांनी सटकावले 15 patient died in gondia due to lack of oxygen, gopichand paldalkar fires solvo at nawab malik

    पालकमंत्री नबाब मलिकांच्या गोंदिया जिल्ह्यात १५ रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; अपयश झाकण्यासाठीच मलिकांचे बेछूट आरोप; पडळकरांनी सटकावले

    प्रतिनिधी

    मुंबई – कोरोनाच्या प्रकोपात महाराष्ट्रात राजकारणही भडकले असताना एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. नवाब मलिक ज्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे काल एकाच दिवसात ॲाक्सिजन अभावी १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 15 patient died in gondia due to lack of oxygen, gopichand paldalkar fires solvo at nawab malik

    या मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नबाब मलिकांना घेरले आहे. ते म्हणाले, की त्या रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देण्याऐवजी, स्वत;चं पाप झाकण्यासाठी आणि आपल्या अकार्यक्षमेतवर पांघरूण घालण्यासाठी नबाब मलिक हे भाजपावर बेछूट आरोप करत आहेत. पण हा महाराष्ट्र आहे. नवाबभाई ये पब्लिक है सब जानती है…,”



    आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत हात झटकले आहेत. ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकही मृत्यू झाला नाही, असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले आहे. ही कोणती संवेदनशीलता?, अशी विचारणाही गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

    मागच्या दीड वर्षांपासून पहिल्या फळीतील अथक परिश्रम घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी व डॅाक्टरांशी सरकारला साधा संवादही करावासा वाटत नाही. त्यांच्याशी चर्चाही करत नाही. कालच मला कळाले आरोग्य कर्मचारी व डॅाक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. सगळ्या गोष्टी जनतेकडून अपेक्षित आहेत, पण सरकारचा कसलाही ॲक्शन प्लान नाही. या सरकारने बेशरमपणाचा कळस गाठला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

    -केंद्र सरकारने औषधांच्या किमती कमी केल्या

    पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान नरेद्र मोदींनी औषधांचा साठा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले असून किंमती कमी केल्या आहेत. अशा संकटाच्या काळात जे उद्योजक महाराष्ट्रात रेमडेसिविरचा पुरवठा करण्यासाठी स्वत: पुढाकार घेत आहेत त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याची योजना राज्य सराकारने आखली आहे. यातून आपला काय हेतू आहे हे दिसत आहे.

    15 patient died in gondia due to lack of oxygen, gopichand paldalkar fires solvo at nawab malik

    महत्वाच्या बातम्या वाचा

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस