• Download App
    परळी शहरातून तब्बल १४० गाढवे चोरीला; संभाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार । 140 donkeys stolen from Parli Complaint lodged at Sambhajinagar police station

    परळी शहरातून तब्बल १४० गाढवे चोरीला; संभाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार

    विशेष प्रतिनिधी

    बीड : दुचाकी, मोबाईल यासह इतर चोरीच्या घटना आपण पाहिल्या असतील.मात्र बीडच्या परळी शहरातून चक्क १४० गाढवे चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हा प्रकार खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शहरात घडला आहे. या प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 140 donkeys stolen from Parli Complaint lodged at Sambhajinagar police station



    परळी शहरात वीटभट्टीसह इतर कामांसाठी भोई, बेलदार आणि वडार समाजाकडे गाढवे आहेत. मात्र मागील पंधरा दिवसांपासून एक एक करत तब्बल १४० गाढवे चोरीला गेली आहेत. या संदर्भात संभाजीनगर पोलिस ठाण्यात गाढवांच्या मालकांनी धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, काम नसले की, ही गाढवे शहरात सोडून दिली जातात. जेव्हा कामाची गरज लागेल तेव्हा त्यांचा शोध मालकांकडून घेतला जातो. त्यामुळे त्यांनी गाढवांची खरेदी कुणाकडे केली होती? आणि त्याचे दाखले मिळाल्यास गाढवे शोधण्यासाठी मदत होईल. त्या मदतीच्या आधारे शोध घेतला जाईल. दरम्यान, या प्रकरणात खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती देऊन शोध सुरू आल्याचे सांगितले आहे.

    140 donkeys stolen from Parli Complaint lodged at Sambhajinagar police station

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ashok Kharat : रूपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस; पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहाराचे प्रकरण

    Bombay High Court : पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा:न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

    Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना