• Download App
    जी 20 परिषदेच्या महाराष्ट्रात 14 बैठका; मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नागपूरचा समावेश 14 meetings of G20 Council in Maharashtra

    जी 20 परिषदेच्या महाराष्ट्रात 14 बैठका; मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नागपूरचा समावेश

    प्रतिनिधी

    मुंबई : भारताला जी 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून, महाराष्ट्रात या परिषदेच्या 14 बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती शोकेस आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचा नावलौकीक वाढावा यासाठी शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता यांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. 14 meetings of G20 Council in Maharashtra

    जी २० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. 1 डिसेंबरपासून भारताला जी 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भारताकडे राहणार आहे. या कालावधीत देशभरात परिषदेच्या 161 बैठका होणार असून त्यापैकी 14 बैठका महाराष्ट्रात होतील. मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होणार आहेत.



    • 13 ते 16 डिसेंबर या कालावधीत मुंबईमध्ये परिषदेच्या विकास कार्य गटाची बैठक होणार आहे. त्यानंतर पुणे येथे येत्या 16 आणि 17 जानेवारीला पायाभूत सुविधा कार्यगटाची तर संभाजीनगर येथे 13 व 14 फेब्रुवारीला बैठक होणार आहे.
    • 21 आणि 22 मार्चला नागपूर येथे रिग साईड इव्हेंट होणार आहे. त्यानंतर पुन्हा मुंबईत २८ आणि ३० मार्च, १५ ते २३ मे आणि ५ व ६ जुलै, १५ व १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत विविध बैठका होतील.
    • पुणे येथे १२ ते १४ जून, २६ ते २८ जून या कालावधीत बैठका होणार आहेत. या परिषदेच्या आखणी व नियोजनाकरिता चार अधिकाऱ्यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

    20 वर्षानंतर मिळते संधी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गर्शनाखाली आपल्या देशाला जी 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. देशाचे आणि आपल्या राज्याचे जगात नावलौकीक करण्यासाठी ही संधी असून त्यासाठी शहर सौंदर्यीकरणावर अधिक भर द्यावा. रस्त्यांची दुरूस्ती, चौकांचे सुशोभीकरण, रोषणाई याबाबींवर भर देऊन परिषदेच्या बैठक काळात शहरांचा चेहरामोहरा बदलावा, आपल्या राज्याचे आणि शहराचे जगात ब्रँडींग करण्यासाठी याचा उपयोग करून घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

    उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळणे मोलाचे आहे. एकदा अध्यक्षपद मिळाले की त्यानंतर 20 वर्ष ते मिळत नाही. त्यामुळे आपल्याला देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेच्या बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नका. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा, विविध खासगी संस्था, संघटनांना देखील सहभागी करून घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

    14 meetings of G20 Council in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!