• Download App
    "तेरा"चे पॅकेट, सूक्ष्म धमाका; म्हणे, परिवर्तन विकास मंचाचे नेते "इंडिया" आघाडीच्या व्यासपीठावर!! 13 parties parivartan vikas manch to participate in I.N.D.I.A. meeting in Mumbai, but their impact is minimal

    “तेरा”चे पॅकेट, सूक्ष्म धमाका; म्हणे, परिवर्तन विकास मंचाचे नेते “इंडिया” आघाडीच्या व्यासपीठावर!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातल्या परिवर्तन विकास मंचाचे नेते “इंडिया” आघाडीच्या मुंबईतल्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरच्या बैठकीत सामील होणार असल्याची “मोठी” बातमी आहे. पण महाराष्ट्रातील राजकीय वस्तुस्थिती लक्षात घेता याचा अर्थ “तेरा”चे पॅकेट, सूक्ष्म धमाका!!, असाच होतो आहे. कारण या परिवर्तन विकास मंचामध्ये महाराष्ट्रातले 13 पक्ष समाविष्ट आहेत. आता या “तेरा” पक्षांची नावे काय आहेत??, याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. 13 parties parivartan vikas manch to participate in I.N.D.I.A. meeting in Mumbai, but their impact is minimal

    कारण शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या खेरीज उर्वरित पक्ष आणि त्या पक्षांचे नेते महाराष्ट्राला माहिती तरी आहेत का??, हा खरा प्रश्न आहे.

    जिल्हा परिषदा, तालुका पंचायती, नगरपंचायती, ग्रामपंचायती या छोट्या-मोठ्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर छोट्या-मोठ्या आघाड्या, युत्या होत असतात, त्यांना वेगवेगळी नावे दिली जातात. निवडणुका हरल्या की त्या आघाड्या विसर्जित होतात, तसलाच हा “महाराष्ट्र व्यापी” प्रकार दिसतो आहे. कारण परिवर्तन विकास मंचात 13 “तेरा” पक्ष आहेत, असे सांगितले जात असले तरी त्याची साधी यादी देखील कुठल्या माध्यमांवर उपलब्ध नाही.

     

    हा विकास मंच स्थापला आणि त्याची बैठक लवकरच कोल्हापुरात होणार, असे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले होते, पण ती बैठकही झाली नाही आणि ते नेतेही कोल्हापुरात फिरकल्याची बातमी आली नाही.

    त्याउलट स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडून रविकांत तुपकर हे राजू शेट्टींपासून बाजूला गेल्याच्या बातम्या मध्यंतरी गाजल्या. त्यामुळे परिवर्तन विकास मंच या आघाडीत 13 “तेरा” पक्ष असले, तरी त्यांचा एकूण साईज किती?? त्यांचा प्रभाव किती?? आणि ते लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कसा आणि कोणता दिवा लावणार??, हा प्रश्नच आहे.

    पण तरी देखील माध्यमांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराला मोठे यश मिळाल्याचे दाखवून हा परिवर्तन विकास मंच “इंडिया” आघाडीच्या बैठकीत सामील होण्याच्या मोठ्या बातम्या दिल्या आहेत. पण या बातम्या जरी मोठ्या असल्या तरी महाराष्ट्रातील राजकीय वस्तुस्थिती मात्र “तेरा”चे पॅकेट आणि सूक्ष्म धमाका!!, अशीच दिसते आहे!!

    13 parties parivartan vikas manch to participate in I.N.D.I.A. meeting in Mumbai, but their impact is minimal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ