विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय फौजदारी कायदे असले 124 ए राजद्रोह कलम याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची परस्पर विसंगत वक्तव्ये समोर आली आहेत. 124 A Treason: Pawar says, repeal clause !!; Raut says, the treason clause against Rana couple is correct !!
पवारांनी भीमा कोरेगावच्या दंगल प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करताना 124 ए या राजद्रोहाच्या कलमाचा अनेकदा गैरवापर झाला आहे. त्यामुळे हे कलमच पूर्णपणे रद्द करून टाकावे, असे नमूद केले आहे. मात्र त्याचवेळी संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावरचे 124 ए राजद्रोहाचे कलम योग्यच असल्याचे दावा केला आहे. राणा दाम्पत्याला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या होत्या. हा राजद्रोहच आहे, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवारांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात चौकशी आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर करताना 124 ए कलम हटवण्याची गरज व्यक्त केली. हे कलम इंग्रजांच्या काळात भारतीय देशभक्तांविरुद्ध वापरले जायचे याची आठवण त्यांनी करून दिली आहे. यात त्यांनी अप्रत्यक्षपणे शहरी नक्षलवादाचे समर्थन केले आहे. वर्नन गोल्सान्विस, सुधा भारद्वाज, सुधीर ढवळे वगैरे शहरी नक्षलवादी विचारवंतांवर 124 ए हे कलम लावण्यात आले आहे. आपल्या वक्तव्यातून आणि लेखनातून या विचारवंतांनी केंद्र सरकार विरुद्ध हिंसक आंदोलनासाठी बौद्धिक समर्थन केले आहे, असे राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने नमूद केले आहे. मात्र पवारांचा या कलमाला विरोध आहे.
राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्याचा आग्रह धरला. या मुद्द्यावर मात्र त्यांच्याविरोधात 124 ए हे राजद्रोहाचे कलम लावण्याचे संजय राऊत यांनी समर्थन केले आहे.
124 A Treason : Pawar says, repeal clause !!; Raut says, the treason clause against Rana couple is correct !!
महत्त्वाच्या बातम्या
- कोकण चित्रपट महोत्सव – २०२२ रूपरेषा व पुरस्कार जाहीर
- Raj Thackeray : सभेपेक्षा जास्त चर्चा अटीशर्तींची; 15000 च्या गर्दीची…!!; पण यातले रहस्य काय…??
- हिंदीविरुध्द वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची उडी, बॉलीवुडवर साधला निशाणा
- समाज ठरवेल तोपर्यंतच सरकार राहू शकते, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- मुंबई पोलीसांनी आपल्या नावावर बनावट एफआयआर केला दाखल, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
- शेतकरी मेळाव्यांमध्ये अल्ला हू अकबरच्या घोषणा देणारे राकेश टिकैत यांचा भोंगे हटविण्याच्या मागणीला पाठिंबा