• Download App
    भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा शिवसेनेला आनंद, पण त्यांची ताकद घटणे हे पवारांच्या पथ्यावर पडणे उध्दव ठाकरेंना परवडेल का...??। 12 BJP MLAs suspension; uddhav thackeray will have to pay the political price for that

    भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा शिवसेनेला आनंद, पण त्यांची ताकद घटणे हे पवारांच्या पथ्यावर पडणे उध्दव ठाकरेंना परवडेल का…??

    विनायक ढेरे   

    नाशिक : विधानसभेत गदारोळाच्या निमित्ताने १२ आमदारांच्या निलंबनाच्या निमित्ताने भाजपची ताकद घटली, याचा शिवसेनेला आनंद होणे स्वाभाविक आहे. आपल्या पेक्षा दुप्पट ताकद कमवणाऱ्या पक्षाची ताकद घटल्याचा तो आनंद आहे. पण भाजपची ताकद घटणे हे जर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भविष्यकालीन राजकारणाच्या पथ्यावर पडणार असेल, तर ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना परवडेल काय??, हा खरा प्रश्न आहे. 12 BJP MLAs suspension; uddhav thackeray will have to pay the political price for that



    भाजपची ताकद घटली तर ती उध्दव ठाकरेंना हवीच आहे. कारण त्यानिमित्ताने उध्दव ठाकरेंची political bargaining powar वाढते. पण त्याचवेळी शिवसेना – राष्ट्रवादी यांच्या checks and balance मध्ये पवारांची बाजू वरचढ झाली तर ती उध्दव ठाकरे यांना चालणार आहे का…?? तसे होऊ देणे उध्दव ठाकरेंना परवडणारे आहे काय…?? याचे ठाम उत्तर “नाही”, याच शब्दात द्यावे लागेल. कारण शिवसेना – राष्ट्रवादी यांच्यातील checks and balance मध्ये पवारांची बाजू जरा जरी वरचढ झाली तर त्याचा फटका सत्तेतल्या शिवसेनेला अधिक बसणार हे उध्दव ठाकरे पुरते ओळखून आहेत. भाजपची ताकद घटणे ही घटना अंतिमतः उध्दव ठाकरेंना नामोहरम करण्यासाठी पवारांची ताकद वाढविण्यासारखे आहे. उध्दव ठाकरे तसे घडू देण्याची शक्यता कमी आहे.

    आणि म्हणूनच कदाचित उध्दव ठाकरे हे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची खेळीही करू शकतील. भाजपला झटका देऊन झाला आहे. पण पवारांची यानिमित्ताने कायमची ताकद वाढायला नको, यासाठी त्यांना हे करावे लागण्याची शक्यता आहे.

    12 BJP MLAs suspension; uddhav thackeray will have to pay the political price for that

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस