प्रतिनिधी
मुंबई – विधानसभेतले तालिका सभापती भास्कर जाधव यांनी भाजपचे १२ आमदार निलंबित केल्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले असून भाजपने विधिमंडळाच्या दारात प्रतिअधिवेशन भरवत ठाकरे – पवार सरकारला राजकीय टक्कर देत आहे. 12 BJP MLAs suspension; BJP holds counter session in maharashtra lesistature
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सध्या प्रचंड गोंधळ सुरु आहे. विरोधकांनी सभागृहाच्या बाहेरच पायऱ्यांवर प्रतिअधिवेशन भरवले आहे. या गोंधळातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ठाकरे – पवार सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे म्हणून या सरकारने आता दडपशाही सुरु केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेला आहे. लोकशाहीची हत्या सुरु आहे. काल (५ जुलै) आम्हाला लक्षात आले की भास्कर जाधवांकडून आम्हाला धोका आहे. काल शिवीगाळ त्यांनी केली आणि वरुन तेच म्हणतात की मला शिव्या दिल्या. त्यामुळे त्यांना आमच्यापासून धोका हे धादांत खोटं आहे,” असा आरोप फडणवीस यांनी केला.
फडणवीस यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. “शेतकरी, ओबीसी, मराठा, मागासवर्गीय, विद्यार्थी, एमपीएससी, विम्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवला, तर खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केले. जे घडलेच नाही; ते घडले आहे, असे सांगून धादांतपणे खुर्चीवरुन खोट बोलून आमदारांना निलंबित केले गेले म्हणून आज या विधानसभेत मी या सरकाच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवतो आहे,” असे फडणवीस म्हणाले.
12 BJP MLAs suspension; BJP holds counter session in maharashtra lesistature
महत्त्वाच्या बातम्या
- सभागृहात गोंधळ, तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन प्रकरणात भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन
- Mansoon Session 2021 : विधानसभेत तुफान गदारोळ; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, वाचा सविस्तर…
- महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत; प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ठाम
- स्टॅन स्वामींचे निधन, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक