विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यस्तरीय १०० कवी, लेखक आणि ११ प्रकाशकांची फौज घेऊन बालसाहित्याच्या १६ पानी पुस्तकांचा १११ बालसाहित्यांचा भव्य ऑनलाईन प्रकाशन सोहळा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज पार पडला.111 Children’s literature grand online publication
वाचनसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी “वाचू आनंदे ” या उपक्रमांतर्गत डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट आयोजित बालसाहित्यिका माजी विश्वकोश अध्यक्षा डॉ. विजया वाड यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या ऑनलाईन प्रकाशन समारंभाला ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ.विजया वाड, डॉ. निशिगंधा वाड, सुकृत खांडेकर, प्रवीण दवणे, पुनम राणे, ११ प्रकाशक ऑनलाइन उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मुलांना वाचायला आवडेल ती पुस्तके मुलांना वाचायला दिली पाहिजे. पालकांनी मुलांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची आवड निर्माण करावी. या ट्रस्टमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम प्रशंसनीय आहे.
111 Children’s literature grand online publication
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : हवाई दलाच्या ७५ विमानांची अनोखी मानवंदना राजपथ अनुभवणार!!
- मुंबई : राणीच्या बागेत नुकतच झालय एका नवीन पाहुण्याचं आगमन , वाघिणीच्या बछड्याच महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते नामकरण
- “अमरावतीवरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव” – माजी कृषि मंत्री अनिल बोंडे
- भल्या पहाटे ‘भुजबळ फार्म’ बाहेर निषेधाची काळी रांगोळी , पोलीस बंदोबस्तात केली वाढ