• Download App
    कुटुंबातील व्यक्तींकडूनच ११ वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार । 11 years old girl raped by four family members crime registered in police station

    कुटुंबातील व्यक्तींकडूनच ११ वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार

    एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आजाेबा, वडील, अल्पवयीन भाऊ आणि चुलत मामा यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब शाळेतील समुपदेशक महिलेच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदर चाैघांजणां विराेधात बंडगार्डन पाेलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंग, पास्काेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आजाेबा, वडील, अल्पवयीन भाऊ आणि चुलत मामा यांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब शाळेतील समुपदेशक महिलेच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदर चाैघांजणां विराेधात बंडगार्डन पाेलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंग, पास्काेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 years old girl raped by four family members crime registered in police station

    यासंर्दभात २९ वर्षीय समुपदेशक महिलेने बंडगार्डन पाेलीस ठाण्यात आराेपीं विराेधात फिंर्याद दिली आहे. त्यानुसार पाेलीसांनी मुलीचे ४५ वर्षीय वडील, १४ वर्षीय भाऊ, आजाेबा व चुलत मामा विराेधात गुन्हा दाकल केला आहे. सदर पिडित मुलगी ही काेराेगाव पार्क परिसरात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेत महिला समुपदेशकाच्या माध्यमातून विद्यार्थीनांना ‘गुड टच, बॅड टच’ याबाबतची माहिती समजवून सांगितले जात हाेते. त्यावेळी यासंर्दभात समुपदेशकांनी विश्वासात ‌घेतल्यानंतर मुलीने मागील चार वर्षापासून तिच्यावर सुरु असलेल्या अत्याचाराची माहिती त्यांना दिली.



    पिडित मुलीचे कुटुंबीय मुळचे बिहारचे रहिवासी असून बिहार मध्ये गावी गेले असताना २०१७ साली वडीलांनी घरात काेणी नसताना तिच्यावर जबरदस्ती करत शारिरिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नाेव्हेंबर २०२० मध्ये पुण्यातील ताडीवाला रस्ता येथील राहते घरात तिच्या १४ वर्षीय भावाने तिच्या साेबत अनेक वेळा जबरदस्ती करत शारिरिक संबंध केले. त्यानंतर, जानेवारी २०२१ मध्ये तिच्या आजाेबानीही तिच्याशी छेडाछाड केली तर मे २०२१ तिच्या चुलत मामाने तिच्यासाेबत गैरवर्तन केले आहे. याबाबत बंडगार्डन पाेलीस ठाण्याच्या सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस.सपकाळे पुढील तपास करत आहे.

    11 years old girl raped by four family members crime registered in police station

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा