प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 12 वी ची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 21 मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल, तर 10 वी ची परीक्षा 2 ते 25 मार्च यादरम्यान होईल. 10th, 12th Exam Time Table Announced;
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांच्या या परीक्षा असतील.
लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाने जाहीर करून या वेळापत्रक बाबत सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि शिक्षक संघटनांच्या प्राप्त झालेल्या सूचनांची दखल घेत 10 वी आणि 12 वी लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.
अशी होईल परीक्षा
मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/indexmarathi.htm संकेतस्थळावर अधिकृत वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळातर्फे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात आहे.
विद्यार्थ्यांनी या अधिकृत वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी करावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.
10th, 12th Exam Time Table Announced;
महत्वाच्या बातम्या