वृत्तसंस्था
मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने कोरोना रुग्णांना 100 बेड्स, 500 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर देण्याचा संकल्प केला आहे. 100 beds and 500 Oxygen concentrater will be provided : Jacqueline Fernandez
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत. सलमान खान, अक्षयकुमार, प्रियांका चोप्रा, अनुष्का-विराट, सोनू सूद अशी बरीच मंडळी आहेत. यात आता जॅकलीनही फाऊंडेशनद्वारे मदत करू लागली आहे. तिच्या योलो फाऊंडेशन मार्फत ती घाटकोपरच्या कोविड केअर सेंटरसाठी काम करत आहे. आता तिने आणखी मदत करण्याचे ठरविले आहे.
जॅकलीनने कोरोना योद्धयाच्या जेवणाची व्यवस्था केली होती. शिवाय, आपल्या योलो फाऊंडेशनकडून अनेकांना बेड्स मिळवून दिले. सध्या 100 बेड्सचं रुग्णालय आणि 500 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर देता येतील का यावर तिचे काम चालू आहे.
ती म्हणते, सध्या दोन रुग्णवाहिका पुरवतो. त्यामुळे तातडीने रुग्णालयात जाता येईल. आणखी बेड्सची व्यवस्था झाली तर त्याचा फायदा रुग्णांना होऊ शकेल. रुग्णांसाठी हेल्पलाईनचा विचारही ती करते आहे.
100 beds and 500 Oxygen concentrater will be provided : Jacqueline Fernandez
महत्त्वाच्या बातम्या
- रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात वीजपुरवठा बहाल ; चक्रीवादळानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांची तप्तरता
- कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी कुचकामी, उपचारातून हटविली ; एम्स, आयसीएमआरकडून नवीनमार्गदर्शक तत्वे जारी
- Corona Updates राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तब्बल 48 हजार जणांना डिस्चार्ज
- प्रायव्हसी पॉलिसी कायद्यानुसारच असल्याचे व्हॉट्सअॅपचे न्यायालयात स्पष्टीकरण, पालन केले नाही तर अकाऊंट नष्ट केले जाणार
- भारतातील लसीकरणाविरुध्द षडयंत्र : डॉ. शाहिद जमील यांचा राजीनामा आणि जेकब पुलियल यांची लसीविरुध्द याचिका
- लोकांना धीर देण्याऐवजी विरोधक घाबरवत आहेत, योगी आदित्यनाथ यांचा आरोप