विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील नाशिकजवळ रविवारी रेल्वे अपघात झाला. येथे ११०६१ एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे लहवित आणि देवळाली (नाशिकजवळ) दरम्यान ३ वाजण्याच्या सुमारास डाऊन मार्गावर रुळावरून घसरले.10 railway coaches fell near Deolali
मध्य रेल्वेच्या सीपीआरओने ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी पोहोचल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, जयनगर एक्स्प्रेस सकाळी ११.३० वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नाशिककडे निघाली होती. दुपारी ३ वाजता देवळाली (नाशिकजवळ) येथे पोहोचल्यावर डाऊन मार्गावरील ट्रेनचे १० डबे रुळावरून घसरले. या अपघातात अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
या दुर्घटनेमुळे त्या मार्गावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात व्यत्यय आला. प्रवाशांना त्यामुळे मन:स्ताप झाला.
10 railway coaches fell near Deolali
महत्त्वाच्या बातम्या
- ED Action : राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंच्या मुलाची ईडी चौकशी; घोटाळा 500 कोटींच्या घरात!!
- इम्रान खान अविश्वास प्रस्ताव मतदानाशिवाय फेटाळला
- Imran’s Bouncer : पाकिस्तानात नॅशनल असेंब्ली बरखास्तीची इम्रानची खेळी; उपसभापतींकडून अविश्वास प्रस्ताव खारीज!!
- काश्मिरी हिंदूंनो; मायभूमीत परत या ! ; सरसंघचालकांचे आवाहन