• Download App
    Shalinitai Patil: Witnesses to Congress's political glory days have been lost!! शालिनीताई पाटील : काँग्रेसच्या राजकीय वैभवशाली काळाच्या साक्षीदार हरपल्या!!

    शालिनीताई पाटील : काँग्रेसच्या राजकीय वैभवशाली काळाच्या साक्षीदार हरपल्या!!

    Shalinitai Patil

    शालिनीताई पाटील वयाच्या 94 व्या वर्षी कालवश झाल्या. काँग्रेसच्या राजकीय वैभवशाली काळाच्या साक्षीदार हरपल्या. शालिनीताईंनी आपल्या दीर्घायुष्यात अनेक राजकीय चढ-उतार बघितले. त्यात त्यांनी कधी प्रत्यक्ष सहभाग घेतला तर कधी साक्षी भावाने सहभाग नोंदविला. त्या जीवनाच्या प्रत्येक काळात सक्रिय राहिल्या.Shalinitai Patil: Witnesses to Congress’s political glory days have been lost!!

    1970 आणि 80 च्या दशकात काँग्रेसचा चढता आणि उतरता काळ शालिनीताईंनी अतिशय जवळून अनुभवला. त्यांनी काँग्रेस निष्ठा कधी सोडली नाही. त्या इंदिरा गांधींच्या जवळच्या नेत्या म्हणून ओळखल्या गेल्या. अत्यंत बुद्धिमान असल्याने शालिनीताईंनी अनेक आव्हाने व्यवस्थित पेलली. सुरुवातीला वसंतदादा पाटलांच्या वैयक्तिक सहायिका आणि नंतर पत्नी म्हणून त्यांनी कर्तव्य निभावले, पण त्याचवेळी दादांना फार मोठी राजकीय साथ करण्यात आणि मिळवून देण्यात शालिनीताईंचा सिंहाचा वाटा राहिला.



    – इंदिरानिष्ठ शालिनीताई

    1980 च्या दशकात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फार मोठी उलथापालथ झाली. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने इंदिरा गांधींची साथ सोडून स्वतःचा वेगळा आणि स्वबळाचा मार्ग पत्करला त्यावेळी सुरुवातीला शालिनीताईंनी त्यांची साथ दिली, पण नंतर काही दिवसांमध्येच त्यांनी इंदिरा गांधींची साथ द्यायचे ठरविले. त्यांचा तो निर्णय दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने योग्य ठरला. शालिनीताईंनी अगदी यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात कराड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांना जेरीस आणले यशवंतराव त्यावेळी कसेबसे निवडून येऊन लोकसभेवर पोहोचले होते. शालिनीताईंनी त्यावेळी इंदिरा काँग्रेसचा झंझावाती प्रचार केला होता. इंदिरा गांधींनी सुद्धा शालिनीताई यांच्यावर विश्वास ठेवून 1981 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अब्दुल रहमान अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांना महसूल मंत्रीपदासारखे महत्त्वाचे मंत्रिपद दिले. त्यांच्या महसूल मंत्री पदाच्या काळात त्यांनी पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला 200 एकर शासकीय जमीन दिली आज त्याच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर शरद पवार वर्चस्व गाजवून आहेत.

    – वसंतदादांच्या साथीदार

    याच शालिनीताईंनी 1978 मध्ये शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून बनविलेले सरकार पाहिले. त्यावेळी वसंतदादांची राजकीय तगमग पाहिली. वसंतदादांना मोठा धीर देऊन त्यांनी सावरले. वसंतदादा नंतर इंदिरा काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस झाले. त्याचवेळी शालिनीताई महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या फार महत्त्वाच्या नेत्या बनल्या. त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा घेतले जाऊ लागले. पण अंतुले सरकार मधले काही निर्णय वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांनी अंतुले यांच्या विरोधात सुद्धा रणशिंग फुंकायला कमी केले नाही.

    – प्रसंगी पवारांशी सुद्धा संघर्ष

    शालिनीताईंनी आयुष्यभर राजकीय संघर्ष केला काही वेळा त्यांनी शरद पवारांशी सुद्धा जुळवून घेतले. आर्थिक निकषावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडावे लागले, पण शालिनीताईंनी आपली तात्विक भूमिका सोडली नाही शेवटी शरद पवारांना मराठा आरक्षणाच्या बाजूने उभे राहावे लागले, हा शालिनीताईंच्या राजकीय भूमिकेचा विजय ठरला होता.

    “महाराष्ट्राच्या राजकारणातली वाघीण”, अशा शब्दांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचे वर्णन केले होते, ते उचित ठरवून त्या कालवश झाल्या.

    Shalinitai Patil: Witnesses to Congress’s political glory days have been lost!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुंबईत स्वतंत्र, आघाडी इतरत्र; काँग्रेसच्या भूमिकेवरील संशय दूर; ठाकरे बंधूंच्या युतीत पवारांचा खोडा!!

    पुणे, पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना आबा बागुल मात्र शिंदे सेनेत!!

    नवाब मलिकांचा विषय बाजूला ठेवून महायुतीत शिरकाव करायचा राष्ट्रवादीचा डाव!!