• Download App
    मुकेश अंबानींना पुन्हा धमकी ; ''४०० कोटींची खंडणी न दिल्यास...'' असा इशाराही दिला! | The Focus India

    मुकेश अंबानींना पुन्हा धमकी ; ”४०० कोटींची खंडणी न दिल्यास…” असा इशाराही दिला!

    मुकेश अंबानी यांना सतत ईमेलद्वारे धमक्या येत आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना सतत ईमेलद्वारे धमक्या येत आहेत. मुंबई पोलिसांनी सांगितले की, पुन्हा एकदा धमकीचे ईमेल आले आहेत. ही धमकी अन्य कोणाची नसून त्याच अज्ञात व्यक्तीने दिलेली आहे ज्याने 400 कोटी रुपयांची मागणी करणारा ईमेल पाठवला होता. Mukesh Ambani threatened again

    पोलिसांनी सांगितले की 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान दोन धमकीचे ईमेल आले होते. यापूर्वी पाठवलेल्या मेलकडे दुर्लक्ष केल्यास परिणामांचा इशाराही दिला आहे.

    उल्लेखनीय आहे की, पहिला धमकीचा ईमेल 26 ऑक्टोबरला आला होता. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर त्याने खंडणीची किंमत 200 कोटी रुपये केली आणि पैसे न दिल्यास मुकेश अंबानींना गोळ्या घालू, असेही त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर तिसऱ्या ईमेलमध्ये त्याने 400 कोटींची मागणी केली होती.

    अंबानींच्या अधिकृत आयडीवर पाठवलेला तिसरा ईमेल होता, ‘तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत 400 कोटी रुपये आहे आणि पोलीस माझा माग घेऊन अटक करू शकत नाहीत. असं त्यात म्हटलं होतं.

    Mukesh Ambani threatened again

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!