भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पुरोगामी आहेत. स्त्रियांचा मान ठेवणं हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे, आणि ते पार पाडतात असे म्हणत अमृता फडणवीस यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचा विराेध केला आहे.Women get most respect in Rss, Amruta Fadnvis
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पुरोगामी आहेत. स्त्रियांचा मान ठेवणं हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे, आणि ते पार पाडतात असे म्हणत अमृता फडणवीस यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचा विराेध केला आहे.
आमदारांची मुले, खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे हे दारू पिऊन पडतात असे कराडकर यांनी म्हटले हाेते. यावर बाेलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, स्त्रियांनी आपल्या देशात अगोदरच खूप भोगलं आहे. महिलांवर टीका करणं चुकीचेच आहे. विशेषत: महिलेवर वैयक्तिक टीका करणे चुकीचे आहे. ही मानसिकतेची बाब असून समाजात लोकांच्या या मानिसकतेत बदल आणायचा आहे.
अमृता फडणवीस यांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा निशाणा
भाजपा आणि आरएसएसच्या सांगण्यावरुन कराडकर यांनी आराेप केले यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, भाजप आणि आरएसएस हे पुरोगामी आहेत. स्त्रियांचा मान ठेवणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे, आणि ते पार पाडतात. मी आरएसएस आणि भाजपच्या लोकांच्या जवळ आहे. पण, मी नॉन पॉलिटीकल आहे. स्त्रीचा सर्वात जास्त आदर कोण करत असेल तर आरएसएस करते, असे मी एका वाक्यात सांगते,.
आघाडी सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाल्या, महावसुली आघाडी सरकारची जी कामे सुरु आहेत, जगही बोलतेय की दुजाभाव सुरु आहे. एकाच्या बाबतीत वेगळी कारवाई, दुसऱ्याच्या बाबतीत वेगळी कारवाई केली जात आहे. तुम्ही हे विसरून जा की मी देवेंद्र फडणवीस यांची बायको आहे, जेव्हा मी काही बोलते. मलाही रस्त्यांच्या खड्ड्यांचा किंवा अन्य गोष्टींचा त्रास होतो. मी सामान्य स्त्री म्हणून बाहेर पडते. या बायका बोलतात की माझे मानसिक संतुलन ढासळले आहे, तसे काही नाही. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के घटस्फोट होतात. ते त्यांच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. तुम्ही यावर बोलणार नसाल तर काय कराल.
Women get most respect in Rss, Amruta Fadnvis
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक; सुप्रिया सुळे – पंकजा मुंडे यांच्या नावांचे उल्लेख भोवले!!
- बैलगाडी शर्यतीत बैल उधळले, रायगड जिल्ह्यातील नांदगाव येथील अपघातात तीन जण जखमी
- सांगलीच्या रणरागिणीकडून महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखर सर