राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आपल्या बेताल आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. ते अक्षरशः वायफळ गडबड करत आहेत. त्यांचं वय आणि जबाबदारीचं पद पाहता त्यांनी पुरावे समोर आणून बोलणं गरजेचे आहे म्हणत त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे जस्मिन वानखेडे यांनी म्हटले आहे.Nabab Malik in trouble due to baseless allegations, Jasmine Wankhede will file defamation suit
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आपल्या बेताल आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. ते अक्षरशः वायफळ गडबड करत आहेत. त्यांचं वय आणि जबाबदारीचं पद पाहता त्यांनी पुरावे समोर आणून बोलणं गरजेचे आहे म्हणत त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे जस्मिन वानखेडे यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेलच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जास्मिन पटेल यांचा उल्लेख लेडी डॉन असल्याचा दाखला देत, या माध्यमातून बॉलिवूडवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. याला उत्तर देतानाही जास्मिन यांनी म्हटले आहे की काही दिवसांनी ते आणखी काही पुरावा घेऊन येतील. असं करुन ते स्वतःचंच नाव खराब करत आहेत. तुम्ही एका महिलेला ट्रोल करुन तिचा अपमान करताय. मी मनचे चित्रपट सेनेच्या लिगल डिपार्टमेंटची उपाध्यक्ष आहे. ते अक्षरशः वायफळ गडबड करत आहेत. त्यांचं वय आणि जबाबदारीचं पद पाहता त्यांनी पुरावे समोर आणून बोलणं गरजेचे आहे.
फ्लेचर पटेल या एकाच व्यक्तीची तीन प्रकरणांमध्ये पंच म्हणून साक्ष NCB ने घेतल्याचा गौप्यस्फोट मलिकांनी घेतला. फ्लेचर पटेलचा समीर वानखेडे यांची बहिण जास्मिनसोबतचा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी यामार्फत बॉलिवूडवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता का असाही सवाल विचारला.
समीर वानखेडे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. तो नेहमी आपल्या कामात असतो, समाजात ड्रग्जच्या माध्यमातून असलेली घाण तो साफ करायचा प्रयत्न करतोय. तो गेले काही दिवसत सातत्याने फोनवर असतो, सामान्य लोकांना ही गोष्ट कळायला हवी. प्रामाणिक माणसं काम करत राहतील. लोकांनी त्याला कितीही झुकवण्याचा प्रयत्न केला तरीही तो झुकणार नाही. तुम्ही आमची चेष्टा केलीत, आमच्या परिवाराला यात मध्ये ओढलं गेलं. जे व्यक्ती आरोप करत आहेत. त्यांनी आधी स्वतःच्या परिवाराकडे पहावे असा सल्लाही त्यांनी मलिक यांना दिला आहे.
Nabab Malik in trouble due to baseless allegations, Jasmine Wankhede will file defamation suit
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!
- चंद्रकांत पाटलांची मोठी ऑफर ; म्हणाले – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा
- जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड
- नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!