विशेष प्रतिनिधी
जळगाव : महाराष्ट्रात कोरोनामुळे पाचशेच्या वरती मुले अनाथ झाली आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची पत्रकार परिषदेत दिली. यावल तालुक्यातील फैजपूर येथे आयोजित कार्यक्रमानानंतर त्या बोलत होत्या.
राज्यात कोरोनामुळे पाचशेच्या वरती मुलांचे आई-वडीलही दगावले आहेत व 14 हजाराच्या वरती मुलानी आई-वडील या पैकी एक जण गमावला आहे. माझं कर्तव्यच आहे. प्रत्येक अनाथांच्या आम्ही संपर्कात आहे. महाराष्ट्रामध्ये लसीकरणाची मोहीम अधिक वेगाने सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुरस्कारासाठी राजीव गांधी यांचे नाव काढून ध्यानचंद यांचे नाव देण्यात आलेला आहे, याचा आम्ही स्वागतच केले आहे.
मुख्यमंत्री हे व्यापक विचारांचे आणि व्यापक मनाचे आहेत, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत ,त्यांच्यामुळेच सरकार व्यवस्थित चालली आहे आणि हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे.
- कोरोनामुळे महाराष्ट्रात 500 मुले झाली अनाथ
- 14 हजार जणांचे आई किंवा वडील दगावले
- लसीकरण अधिक वेगाने सुरु करण्याचे आवाहन
- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे स्वागत
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यापक विचारांचे आणि मनाचे
- राज्य सरकार पाच वर्षे टाकण्याचा विश्वास व्यक्त