• Download App
    चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अनिर्बंध सत्तेचा मार्ग मोकळा |Xi Jinping get another 10 year term

    चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अनिर्बंध सत्तेचा मार्ग मोकळा

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग – चीनमधील महत्त्वाच्या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कालावधीसाठीचा मार्ग मोकळा करण्यात आला.चीनमध्ये दर दहा वर्षांनी संपूर्ण सरकार बदलते. मात्र, चेअरमन माओ यांच्याएवढा स्वत:चा दर्जा करून घेतलेले जिनपिंग हे या नियमास अपवाद ठरणार आहे.Xi Jinping get another 10 year term

    या आधी केवळ माओ आणि त्यांच्या नंतरचे अध्यक्ष डेंग जिओपिंग यांना अतिरिक्त कारकिर्द मिळाली होती. त्यामुळे पक्षाच्या शंभर वर्षांच्या इतिहासात केवळ तिसऱ्यांदाच अध्यक्षांची कारकिर्द वाढवून देणारा ठराव कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे.

    जिनपिंग यांची दुसरी टर्म पुढील वर्षी संपत आहे. यावेळी त्यांचे इतर सर्व मंत्री निवृत्त होणार आहेत. जिनपिंग मात्र त्या पुढील टर्म आणि कदाचित आजीवन अध्यक्षपदावर राहतील. इतकी अनिर्बंध सत्ता केवळ माओ यांनीच उपभोगली होती.

    Xi Jinping get another 10 year term

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या