• Download App
    तालिबानच्या ड्रेसकोडला जगभरातील अफगाणिस्तानी महिलांचे ऑनलाइन मोहीमेद्वारे उत्तर |Womens opposes Talibani dresscode

    तालिबानच्या ड्रेसकोडला जगभरातील अफगाणिस्तानी महिलांचे ऑनलाइन मोहीमेद्वारे उत्तर

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – जगभरातील अफगाणिस्तान महिलांनी तालिबानच्या ड्रेसकोड फतव्याविरोधात सोशल मीडियावर #DoNotTouchMyClothes मोहीम सुरू केली आहे. यानुसार अफगाणी महिला पारंपरिक कपड्यांचा पेहराव करून छायाचित्र शेअर करत आहेत. बुरखा न घालता स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत, असा महिलांनी या माध्यमांतून तालिबान्यांना संदेश दिला आहे.Womens opposes Talibani dresscode

    तत्पूर्वी नव्या तालिबान सरकारच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी म्हटले, की देशातील महिला पदव्युत्तर पदवीपर्यंत विद्यापीठात शिक्षण घेऊ शकतात. परंतु त्यांना वर्गात वेगळे बसावे लागेल. तसेच बुरखा घालणे अनिवार्य आहे. डोळे सोडून संपूर्ण शरीर झाकले जाईल, अशा रीतीने महिलांनी बुरख्याचा पेहराव करावा, असे त्यांनी म्हटले होते.



    यासंदर्भात गेल्या आठवड्यात विद्यापीठात भरलेल्या एका वर्गाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यात एका हॉलमध्ये विद्यार्थिनींचा एक गट नखशिखांत काळे कपडे पेहराव केलेला दिसतो आणि त्याचबरोबर तालिबानचा झेंडाही दिसतो.

    या फोटोनंतर जगभरातील अफगाणिस्तानच्या महिलांत संतापाची लाट उसळली. परिणामी तालिबानच्या ड्रेसकोडच्या विरोधात ऑनलाइन मोहीम सुरू झाली.

    Womens opposes Talibani dresscode

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Malaysia : मलेशियात नमाज पठण विसरल्यास 2 वर्षे शिक्षा; तेरेंगानू राज्यातील शरिया कायद्यात बदल, 60 हजार रुपये दंड

    Russia रशियाचा ट्रम्पवर पलटवार- भारताला 5% स्वस्त दराने तेल पुरवठा करत राहणार

    US Imposes :अमेरिकेने म्हटले- आम्ही भारतावर निर्बंध लादले; युक्रेन युद्ध रोखण्यासाठी रशियावर दबाव आणण्याचा उद्देश