• Download App
    बुरखे विकत घेण्यासाठी काबूलच्या बाजारात महिलांची मोठी गर्दी, तालिबानच्या दहशतीचा परिणाम Womens afraid in Afghanistan due to taliban

    बुरखे विकत घेण्यासाठी काबूलच्या बाजारात महिलांची मोठी गर्दी, तालिबानच्या दहशतीचा परिणाम

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – तालिबानची सत्ता आल्यापासून अफगाणिस्तानात, विशेषत: मोठ्या शहरांमध्ये बुरखा विकत घेण्यासाठी महिलांची बाजारात गर्दी वाढत आहे. तालिबानच्या आधीच्या सत्तेचा अनुभव असल्याने महिलांमध्ये भयाचे वातावरण आहे. Womens afraid in Afghanistan due to taliban

    हिजाब अथवा बुरखा न घातल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटत आहे. दुसऱ्या बाजूला हेरत प्रांतामध्ये काही महिला हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी आंदोलन करत असून सरकारमध्येही महिलांचा सहभाग असावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, सरकारमध्ये महिलांचा समावेश नसेल, असे तालिबानने आधीच स्पष्ट केले आहे.



    दरम्यान तालिबानी दहशतवाद्यांनी गर्भवती असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याची तिच्या कुटुंबासमोर गोळ्या झाडून हत्या केली. अफगाणिस्तानमधील एका पत्रकाराने ट्वीट करून ही माहिती उघड केली. बानू निगारा असे या महिलेचे नाव होते. तालिबानी दहशतवादी तिच्या घरात घुसले आणि घराची झडती घेतली. नंतर मारहाण करून तिला गोळ्या घातल्या, असे या पत्रकाराने सांगितले.

    Womens afraid in Afghanistan due to taliban

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kim Jong : किम जोंग उन यांनी सैन्यदलांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे दिले आदेश!

    Slap on China : Operation Sindoor चे खोटे रिपोर्टिंग केल्याबद्दल चिनी सरकारी माध्यमे Xinhua आणि Global Times वर भारतात बंदी!!

    Deputy Prime Minister : पाकिस्तानचे उपपंतप्रधान म्हणाले- अण्वस्त्रांबद्दल विचार केला नव्हता