• Download App
    काबूलमध्ये तालिबानकडून आता महिलांना काम करण्यास देखील मनाई |Women cant work in Kabul now

    काबूलमध्ये तालिबानकडून आता महिलांना काम करण्यास देखील मनाई

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अफगाणिस्तानमधील नव्या तालिबानी सत्ताधीशांनी शहरातील अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरी थांबण्याचा आदेश दिला असल्याचे काबूलचे हंगामी महापौर हमदुल्ला नामोनी यांनी सांगितले.
    तालिबानने मुलींना शिक्षणासाठी याआधीच बंदी घातलेली आहे.Women cant work in Kabul now

    आता त्यात या नव्या आदेशाची भर पडली आहे.ज्या कामासाठी पुरुषांचा पर्याय देणे शक्य नाही, अशाच ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना काम देण्यास परवानगी आहे. यामध्ये डिझाइन आणि अभियांत्रिकी विभाग तसेच महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


    काबूल महानगरपालिकेतील विभागांमध्ये काम करण्याऱ्या महिलांसंबंधी अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने याकाळात त्यांना वेतन मिळू शकेल, असेही नामोनी म्हणाले.

    Women cant work in Kabul now

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : इस्रायलमध्ये भारतीय UPI लागू होणार, मोदी-नेतन्याहू बैठकीत करार; मोदी म्हणाले – लवकरच मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार

    Jeffrey Epstein : वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे यांचा राजीनामा; लैंगिक गुन्हेगार एपस्टीनसोबत नाव आल्यानंतर पद सोडले

    PM Modi : भारत-मध्यपूर्व-युरोप कॉरिडॉरशी इजिप्त जोडला जाणार, आफ्रिकेसाठी हब, आफ्रिकेतून रेअर मेटल भारतात येणार