प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगभरातील युजरचे लाडके मेसेजिंग ॲप व्हॉट्सअॅप हा जगभरातील सेवा तब्बल दोन तास बंद असल्यामुळे नेटकऱ्यांनी व्हॉट्सअॅपला चांगलेच ट्रोल केले आहे. WhatsAppDown; trollers up
ट्विटरवर सुद्धा #WhatsAppDown हा ट्रेंड सुरू झाला. यावर आम्ही लवकरात लवकर व्हॉट्सअॅप सुरू करू असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. सोशल मिडियावर सध्या अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअॅप जसे डाऊन झाले तसे सोशल मिडियावर मीम्स शेअर करण्यास सुरूवात झाली आहे.
व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यावर मीम्स व्हायरल
व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे आता जगभरातील लाखो युजर्स इतर अॅपकडे वळले आहेत अशाप्रकारचे मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.
अनेक युजर्सने व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यावर फोनचे नेट ऑन-ऑफ करून पााहिले, काहींनी फोन रिस्टार्ट केला तर अनेकांनी व्हॉट्सअॅप खरंच बंद झालंय का हे पाहण्यासाठी इतर अॅप्स चेक केले. अशाप्रकारचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे मेटा सीईओ मार्क झुकरबर्गला सुद्धा ट्रोल करण्यात येत आहे.
WhatsAppDown; trollers up
महत्वाच्या बातम्या
- ऋषी सुनक यांची निवड आणि चिदंबरम यांची भारतीयांना शिकवणी; सुप्त हेतू काय??
- ऋषी सुनक यांची निवड म्हणजे सोनिया गांधींचा मार्ग प्रशस्त होणे आहे काय??
- ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनल्यानंतर पाकिस्तान्यांना आठवले सुनक कुटुंबीयांचे मूळ गाव!!
- गोव्यात नरकासुर दहन; अयोध्येत रामलल्लांचे दर्शन; उज्जैन मध्ये महाकाल पूजन