WhatsApp-Facebook Down : जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा डाऊन झाले होते. वापरकर्त्यांना यावेळी मेसेज पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास अडचणी आल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असाच त्रास जगभरातील अनेक देशांतील युजर्सना झाला. तथापि, आता या अॅप्सनी पुन्हा काम करणे सुरू केले आहे. तीन आठवड्यांपूर्वीच युजर्सना या प्रकारचा त्रास सहन करावा लागला होता. WhatsApp-Facebook Down For second time in a month, Instagram users Also annoyed
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा डाऊन झाले होते. वापरकर्त्यांना यावेळी मेसेज पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास अडचणी आल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असाच त्रास जगभरातील अनेक देशांतील युजर्सना झाला. तथापि, आता या अॅप्सनी पुन्हा काम करणे सुरू केले आहे. तीन आठवड्यांपूर्वीच युजर्सना या प्रकारचा त्रास सहन करावा लागला होता.
वापरकर्त्यांना Can’t access your Facebook feed today?, Instagram photos won’t reload?, Whatsapp messages not going through? असे मेसेजेस आले. इन्स्टाग्रामच्या वापरावेळी “We’re sorry, but something went wrong. Please try again,” असा मेसेज दिसत होता. फेसबुकवरही याच प्रकारचा मेसेज येत होता. वापरकर्ते आपली न्यूजफीड्स रिफ्रेश करू शकत नव्हते.
ट्विटरवर सुरू झाली ट्रोलिंग
याचदरम्यान ट्विटर युजर्सनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन झाल्यानंतर मीम्स शेअर करणे सुरू केले होते. बहुतांश मीम्समध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन झाल्यावर वापरकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय. पाहुयात एक झलक…
WhatsApp-Facebook Down For second time in a month, Instagram users Also annoyed
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईमध्ये धावणार आधुनिक डबलडेकर बस, बेस्टचा 100 बस खरेदीचा निर्णय; प्रवासी सुखावले
- Record Break Corona Cases : देशभरात २४ तासांत १.३१ लाख रुग्ण, ८०० पेक्षा जास्त मृत्यू, पीएम मोदींचे लॉकडाऊनचे न लावण्याचे संकेत!
- आमने-सामने : इम्रानने भारताविरूद्ध ओकली गरळ ; दोन्हीही घटस्फोटीत पत्नींकडून सणसणीत कानउघाडणी
- कोरोना लस निर्मितीचा वेग मंदावणार, अमेरिका, युरोपने कच्चा माल रोखला ; सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांची माहिती
- रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांना अटक ; मुंबई, नांदेडला पोलिसांचे छापे