वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा काळ सुरु झाला आहे. तालिबानचे सरकार सत्तेवर आलेले नाही.अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तान सोडत नाही तोपर्यंत सरकार स्थापन करणार नाही, असे तालिबाननं जाहीर केल आहे. दुसरीकडे तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणी नागरिकांनी पगडी आणि हिजाब खरेदीसाठी दुकानात गर्दी केली आहे. What exactly do Afghans buy? Crowds in the shop to buy turbans and hijabs
तालिबाननं सत्ता हातात घेतली. जे लोक सरकारी नोकरीत होते त्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले. महिलांना पुन्हा काम करण्यावर अचानक बंदी आणली आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रापुरतच महिलांना काम करण्याची मुभा दिली आहे. या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोक नेमकी कशाची खरेदी करतायत असा प्रश्न पडू शकतो.आश्चर्य म्हणजे अफगाण लोक दोन वस्तुंची जोरदार खरेदी करत आहेत.
हिजाब आणि पगडीची खरेदी का?
तालिबानने सत्ता काबीज केली तेव्हापासून लोकांचा कल वस्तू साठवण्याकडे आहे. त्यात अफगाण लोक हिजाब आणि पगडींची खरेदी मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दुकानदारांनी सांगितलं. १९९६ ते २००१ च्या दरम्यान तालिबानचं सरकार अफगाणिस्तान मध्ये होतं. तेव्हा तालिबान सरकारनं पुरुषांना पगडी आणि महिलांना हिजाब अनिवार्य केला होता.
त्यामुळेच आताही हिजाब आणि पगडी पुन्हा अनिवार्य केली जाऊ शकते, अशी भीती लोकांना वाटत आहे. त्यामुळेच पगडी आणि हिजाब खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत, असे पझवोक ह्या स्थानिक वृत्तसंस्थेच्या पाहणीत उघड झाले आहे. हिजाब आणि पगडी खरेदीत चौपट वाढ झाल्याचे अहवालामध्ये म्हटल आहे.
हिजाब, पगडी, बुरख्यांच्या किमती वाढल्या
हिजाब-पगडीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. आधी एका हिजाबसाठी १हजार अफगाणी(चलन) मोजावे लागत होते. आता त्याची किंमत दीड हजाराकडे आहे. तर बुरख्यांची किंमत १० टक्क्यानं वाढल्याचं CNN च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. एका अफगाण महिलेनं सांगितलं की, घरात चार महिला आहेत आणि दोनच बुरखे आहेत. तेच शेअर केले जातात. फारच अती गरज पडली तर पांघरायच्या चादरीचा बुरखा म्हणून वापर केला जातो.
What exactly do Afghans buy? Crowds in the shop to buy turbans and hijabs
महत्त्वाच्या बातम्या
- प्रोजेक्ट्सह भेटा फक्त चर्चा नको,आता सरकारचे फक्त 935 दिवस शिल्लक ; डॉ.कराड
- नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक अन् शिवसैनिक भिडले
- काबूलहून विमान हायजॅक, युक्रेनहून बचाव मोहिमेवर आले होते, आता इराणने केला हा दावा
- नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे पोलीसांवर प्रचंड भडकले; ऑर्डर नसताना पोलीसांनी केली अटक