• Download App
    काय म्हणाली हंगर गेम्स फेम अॅक्ट्रेस जेनिफर लॉरेन्स जेंडर पे गॅप बद्दल? | What did Hunger Games fame actress Jennifer Lawrence say about the gender pay gap?

    काय म्हणाली हंगर गेम्स फेम एक्ट्रेस जेनिफर लॉरेन्स जेंडर पे गॅप बद्दल?

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : जर स्त्री आणि पुरुष एकाच ऑर्गनायझेशन मध्ये एकाच प्रकारचे काम करत असतील तर त्या दोघांना समान वेतन मिळाले पाहिजे. इक्वल पे फॉर इक्वल वर्क ह्याला म्हणतात. जेंडर पे गॅप वरून बऱ्याच चर्चा होताना दिसून येत आहेत. पण बऱ्याच ठिकाणी आजही स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी वेतन मिळते. जेव्हा की स्त्री आणि पुरुष एकाच प्रकारचे काम करत असतात.

    What did Hunger Games fame actress Jennifer Lawrence say about the gender pay gap?

    गुड न्यूज या मूव्हिच्या प्रमोशनदरम्यान करिना कपूरने देखील याबाबतची खंत बोलून दाखवली होती. तर सध्या लिओनार्डो डिकॅप्रियो आणि जेनिफर लॉरेन्स यांची प्रमुख भूमिका असणारा ‘डोंट लूक अप’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये जेनिफर लॉरेन्सला लिओनार्डो डिकॅप्रियो पेक्षा कमी वेतन दिले आहे. आणि यावरून सध्या बऱ्याच चर्चा होताना दिसून येत आहेत.


    डोन्ट लूकअप या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, लियोनार्डो डीकारपीओ आणि जेनिफर लॉरेन्स यांनी दिली प्रलयाची चेतावणी


    याबाबत जेनिफरला प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले की, लिओनार्डो डिकॅप्रियो हा खूप जास्त फेमस आणि उत्तम कलाकार आहे. त्याच्या नावामुळेच बरेच लोक सिनेमा पाहायला येतात. जर माझ्या नावापेक्षा लियोनार्डो डिकॅप्रियोची नावामुळे जास्तीत जास्त लोक सिनेमा पाहायला येणार असतील, तर देण्यात करण्यात आलेला करार हा अतिशय योग्य आहे असे मी म्हणेन. त्यामुळे नेटफ्लिक्सवर झालेल्या करारा बाबत मी संतुष्ट आहे. असे हंगर गेम्स फेम अॅक्ट्रेस जेनिफर लॉरेन्सने सांगितले आहे. पुढे ती असेही म्हणते की, मला जेव्हा हा प्रश्न सतत विचारण्यात येतो, त्यावेळी मात्र वाईट वाटते.

    जेनिफर सध्या प्रेग्नंट आहेत. आपल्या होणार्या मुलाला ती लाईम लाईटपासून पूर्णतः दूर ठेवणार आहे. असे तिने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. कोणत्याही प्रसिध्दीचा माझ्या मुलांच्या संगोपनावर परिणाम होऊ देणार नाही असे तिचे म्हणणे आहे.

    What did Hunger Games fame actress Jennifer Lawrence say about the gender pay gap?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार