• Download App
    WATCH : 71 भू-सुरुंग स्फोटके शोधून हजारोंचे प्राण वाचवणारा उंदीर । watch Hero Rat from Tanzania Retired, Saved Thousands lives by Searching Land Mines

    WATCH : 71 भू-सुरुंग स्फोटके शोधून हजारोंचे प्राण वाचवणारा उंदीर

    सुरुंग शोधण्यात एक्सपर्ट असलेला एक उंदीर निवृत्त झाल्याचे सांगितले तर आश्चर्य वाटले ना ! पण, हे खरे आहे. टांझानिया येथील हा उंदीर ‘मागवा’ या नावाने ओळखला जातो. त्याने तब्बल 71 सुरुंग तसेच कित्येक स्फोटक शोधून हजारो जणांचे प्राण वाचविले आहेत. वयोमानानुसार त्याची सुरुंग शोधण्याची शक्ती कमी झाल्याने तो आता सेवानिवृत्त झाला आहे. जमिनीतील सुरुंग शोधून काढण्यासाठी टांझानिया येथील अपोपो ही संस्था 1990 सालापासून उंदरांना प्रशिक्षण देते. मागवाला तिथेच प्रशिक्षण दिले होते. येथे प्रशिक्षण घेतलेल्या उंदरांना ‘हिरो रॅट’ म्हणून संबोधले जाते.
    मागवाचे वजन 1.2 किलो असून तो फक्त 70 सेमीचा आहे. इतर उंदरांच्या जातीपेक्षा हा उंदीर हलका असतो. मागील वर्षी मागवाला पीडीएसए या संस्थेने सुवर्णपदक देऊन सन्मानित केले होते. या उंदराची खासियत म्हणजे टेनिस कोर्ट इतक्या मैदानातून तो अवघ्या 20 मिनिटांत सुरुंग शोधू शकतो. watch Hero Rat from Tanzania Retired, Saved Thousands lives by Searching Land Mines

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा