वृत्तसंस्था
माद्रीड : स्पेनच्या ला पाल्मातील कॅनरी बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे हाहाकार उडाला आहे. तब्बल ५० वर्षांनंतर लाव्हाचे पाट डोंगरावरून मानवी वस्तीच्या दिशेने वाहू लागल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. हजारो नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.Volcanic eruption on an island in Spain; After 50 years, lava flowed over the Canary Islands; Migration of thousands
माउंट कुंब्रे विजा या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाव्हा रस ओसंडून पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला आहे. त्या बरोबर धूर, दगडधोंडे मोठे आवाज करत बाहेर पडले आहेत. लाव्हा रसामुळे अनेक घरे नष्ट झाली आहेत. पाच हजार लोकांना घरातून सुरक्षेच्या कारणामुळे जबरदस्तीने हलविले आहे.
माउंट कुंब्रे वीजा ज्वालामुखीचा उद्रेक
कॅनरी बेटावरच्या माउंट कुंब्रे विजा या ज्वालामुखीतून धूर, राख आणि लाव्हा रस ओसंडून बाहेर पडत आहे. कॅनरी बेटांवर आज स्फोट होऊन लावा, राख आणि धुराचे लोट बाहेर पडत आहे. ज्यामुळे जवळपासच्या रहिवाशांना बाहेर काढले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्वालामुखीचा १९७१मध्ये शेवटचा स्फोट
कॅनरी बेटे ज्वालामुखी संस्थेने बेटाच्या दक्षिण टोकाजवळ दुपारी ३ नंतर स्फोट झाल्याची माहिती दिली. यापूर्वी १९७१ मध्ये ज्वालामुखीचा स्फोट आणि उद्रेक झाला होता.
हजारो लोकांना बाहेर काढले
ला पाल्मा हे आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील स्पेनचे कॅनरी बेटे द्वीपसमूहातील आठ ज्वालामुखी बेटांपैकी एक आहे. ८५ हजार लोकसंख्या या बेटाची आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
स्फोट होण्यापूर्वी भूकंपाचा हादरा
स्फोट होण्यापूर्वी ४.२ रिशटर तीव्रतेचा भूकंप झाला. जो काबेझा डी वाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात हा उद्रेक झाला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लाव्हाने अखेरीस कमीतकमी आठ घरे नष्ट केली.ज्यामुळे टॉवरसह कमीतकमी एक चाळ कोसळली. लाव्हाचा प्रवाह एल पॅराइसो, अल्काला आणि आसपासच्या भागातील नगरपालिका हद्दीत धोका पोचवू शकतो.
पंतप्रधान सांचेझ कॅनरी बेटांना भेट देणार
स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी न्यूयॉर्कला जाणे पुढे ढकलले आहे. आता ते लवकरच ज्वालामुखीग्रस्त भागाला भेट देण्यासाठी जाणार आहेत.
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मी या क्षणी कॅनरी बेटांकडे जात आहे. ला पाल्मामधील परिस्थिती प्रथम पाहणे महत्वाचे आहे.
– पेद्रो सांचेझ, पंतप्रधान, स्पेन
Volcanic eruption on an island in Spain; After 50 years, lava flowed over the Canary Islands; Migration of thousands
महत्त्वाच्या बातम्या
- शपथविधीआधी पंजाब काँग्रेसमध्ये नव्या वादाची फोडणी, हरीश रावत म्हणतात- सिद्धूंच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढू, सुनील जाखड यांचा उघड विरोध, वाचा सविस्तर…
- पोलिसांनी ताब्यात घेताच रेल्वे स्थानकावरच किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद, म्हणाले- ठाकरेंचा 19 बंगल्यांचा घोटाळा, जरंडेश्वरची पाहणी करणार, रोखून दाखवा!
- मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 5 मुले बुडाली; 2 जणांना वाचवण्यात यश; तीन बेपत्ता
- Indian Railway ! सुवर्णसंधी ! रेल्वेने सुरू केली विशेष योजना-50 हजार तरूणांना मिळेल प्रशिक्षण;’या’ 4 ट्रेडमध्ये मिळवू शकतात नोकरी; घ्या सविस्तर माहिती…
- West Bengal : तृणमूलमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियोंचा भाजपविरोधात प्रचार करण्यास नकार;ममता बॅनर्जींचा प्रचार करणार नाहीत