• Download App
    विजयाची माळ, मृत्यूचा हार किंवा अटकेची तलवार हेच आता ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांचे प्रारब्ध|Victory, defeat or arrest is now the destiny of Brazilian President Jair Bolsonaro

    विजयाची माळ, मृत्यूचा हार किंवा अटकेची तलवार हेच आता ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांचे प्रारब्ध

    विशेष प्रतिनिधी

    ब्राझीलिया: विजयाची माळ, मृत्यूचा हार किंवा अटकेची तलवार हे आता ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांचे प्रारब्ध आहे. २०२२ मध्ये होणाºया निवडणुकांत विजय मिळविला नाही तर आपण मारले जाऊ किंवा अटक केली जाईल, असे तीनच पर्याय असल्याचे बोलसोनोरे यांनीच स्वत: म्हटले आहे.Victory, defeat or arrest is now the destiny of Brazilian President Jair Bolsonaro

    बोलसोनोरे यांनी ब्राझीलमधील निवडणूक प्रक्रियेवरच आक्षेप घेत पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल मानणार नाही असा इशारा दिला आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दती फसवी आहे. यावर आपण विश्वास ठेवत नाही. छापील मतदान पध्दतीनेच मतदान व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.



    बोलसोनोरे हे कट्टर उजव्या विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात. मात्र, बहुतांश मतदान फेऱ्यांत डाव्या आघाडीचे माजी अध्यक्ष लुईझ इनसिओ लुला दा सिल्वा यांच्यापेक्षा ते पिछाडीवर आहेत. आपल्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलसोनारे यांनी ब्राझीलमधील निवडणुक आयोगावर टीका केली आहे.

    आमच्याकडे असे अनेक अध्यक्ष आहेत त्यांना या मतदान पध्दतीवर आक्षेप नाही. परंतु, मी गप्प राहू शकत नाही.मात्र, ब्राझील मतदान आयोगाचे प्रमुख टीएसई यांनी बोलसोनारे यांचे आरोप फेटाळून लावले आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दती अत्यंत सुरक्षित आहे.

    आता पुन्हा छापील मतपत्रिकांचा विचार करणे म्हणजे आपला फोकस वळविण्यासारखे होईल.बोलसोनारो यांनी ७ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी स्थानिक नेत्यांना केले आहे.

    Victory, defeat or arrest is now the destiny of Brazilian President Jair Bolsonaro

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या