• Download App
    मास्क न घालण्याचा आदेश देणारा इस्त्राइल बनला जगातील पहिला देश, लसीकरणामुळे ब्रिटनमध्ये कोविडचा वेग घसरला |Vaccination shows positive impact in Briton, Istrail

    मास्क न घालण्याचा आदेश देणारा इस्त्राइल बनला जगातील पहिला देश, लसीकरणामुळे ब्रिटनमध्ये कोविडचा वेग घसरला

    विशेष प्रतिनिधी 

    लंडन : कोरोना रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम वेगान सुरू असताना त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ब्रिटन, इस्त्रायला या वेगाने लसीकरण होत असलेल्या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होवू लागली आहे.Vaccination shows positive impact in Briton, Istrail

    त्यामुळे लसीकरणाच्या मोहीमेला वेग देण्याची गरज निर्माण झालेली आहे.इस्त्राइलमध्ये देखील लसीकरण मोहीम राबविली गेल्याने लॉकडाउनपासून मुक्तता मिळाली आहे. तेथील नागरिक मास्कऐवजी चेहऱ्यावरच्या हास्याने घराबाहेर पडत आहेत.



    प्रत्यक्षात इस्त्राइलमध्ये ८१ टक्के लसीकरण झाले असून मास्क घालण्याचे बंधन आता राहिलेले नाही. मास्क न घालण्याचा आदेश देणारा इस्त्राइल हा जगातील पहिला देश ठरला आहे.

    लसीकरणामुळे ब्रिटनच्या नागरिकांत उत्साह पसरला असून यावर्षी आणखी बुस्टर डोस घेण्याची तयारी केली जात आहे. बुस्टर डोसमुळे कोरोनाच्या कोणत्याही प्रकाराचा सामना करण्याची शक्ती येणार आहे.

    ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा दर गेल्या सोमवारच्या तुलनेत ७० टक्क्यांने घसरला आहे. याशिवाय ब्रिटनमध्ये कोरोनावाढीचा वेग देखील १७ टक्क्याने कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये ३५६८ जण बाधित झाले होते. परंतु गेल्या चोवीस तासात ही संख्या २९६३ वर आली आहे.

    Vaccination shows positive impact in Briton, Istrail

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या