• Download App
    USA will give permission to 50 thousand afghan people to stay

    तब्बल ५० हजार अफगाणी निर्वासितांना अमेरिका स्वीकारणार , अन्य देशही येणार पुढे

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क – अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे गेल्यानंतर अमेरिकेने अफगाण नागरिकांना मदत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सुमारे ५० हजार अफगाण निर्वासितांना अमेरिका स्वीकारणार आहे. यात प्रामुख्याने अफगाणिस्तानात अमेरिकेला मदत केलेल्यांचा समावेश असेल. USA will give permission to 50 thousand afghan people to stay

    तालिबानकडून ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा नागरिकांनाही अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे. काही हजार नागरिक आधीच अमेरिकेत दाखल झाले आहेत. जर्मनी, स्पेन, कुवेत, पाकिस्तान आणि कतार येथेही अनेक अफगाण नागरिक आश्रयाला गेले आहेत.



    दरम्यान तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानमधील सरकारमध्ये देशातील प्रत्येक समुदायाला प्रतिनिधीत्व मिळावे, अशी अपेक्षा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून कोणत्याही क्षणी सरकार स्थापनेची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर ब्लिंकन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी काळात तालिबानी राजवट कोणत्या धोरणांचा अवलंब करते, हे पहावे लागेल आणि त्यानुसारच त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ब्लिंकन यांनी सांगितले.

    USA will give permission to 50 thousand afghan people to stay

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या