• Download App
    तालिबानबरोबर रहायचे की जगाबरोबर हा निर्णय चीनचा – अमेरिकेने पुन्हा दिला इशारा USA warns China on Taliban issue

    तालिबानबरोबर रहायचे की जगाबरोबर हा निर्णय चीनचा – अमेरिकेने पुन्हा दिला इशारा

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधील राजवटीला जगाकडून मान्यता हवी असल्यास तालिबानकडून काय अपेक्षा आहेत, याबाबत जगाचे एकमत आहे. या परिस्थितीत कोणाच्या बाजूने उभे रहायचे याचा निर्णय चीनने घ्यायचा आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. ‘तालिबानकडून जगाला अनेक अपेक्षा असून, ज्यांना अफगाणिस्तानातून बाहेर पडायचे आहे त्यांना तसे करू देणे, ही त्यापैकीच एक अपेक्षा आहे. USA warns China on Taliban issue

    जगाच्या या प्रयत्नांमध्ये चीनची साथ कोणाला असेल, याचा निर्णय त्यांनीच घ्यायला हवा. अमेरिकेने अफगाणिस्तानातच अडकून पडावे, अशी चीन आणि रशियाची इच्छा होती,’ असे ‘व्हाइट हाउस’च्या वरीष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले. तालिबानवर लादलेले निर्बंध कोणत्याही परिस्थितीत उठविले जाणार नाहीत, असेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.



    दरम्यान तालिबानी दहशतवाद्यांमध्ये अनेक जण पाकिस्तानी नागरिक असल्याच्या आरोपाला पुष्टी देणारा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे अमेरिकेच्या लष्कराचे मुख्यालय असलेल्या ‘पेन्टॅगॉन’ने स्पष्ट केले आहे. ‘काबूलचा पाडाव करण्यासाठी पाकिस्तान सरकारने तालिबान्यांच्या मदतीला त्यांचे १० ते १५ हजार सैनिक पाठविले होते,’ असा आरोप अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांनी केला होता. मात्र, पाकिस्तानलाही दहशतवादाचा फटका बसला असल्याने ते असे करण्याची शक्यता कमी आहे, तसे कोणतेही पुरावेदेखील नाहीत, असे पेन्टॅगॉनने म्हटले आहे.

    USA warns China on Taliban issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या