• Download App
    कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण, लहान मुलांवरील लशींच्या चाचण्या अमेरिकेत सुरू|USA started vaccine testing for children

    कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण, लहान मुलांवरील लशींच्या चाचण्या अमेरिकेत सुरू

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : अमेरिकेत गेल्या महिन्यातच १२ ते १५ वयोगटासाठी फायजर-बायोएनटेक लशीला मान्यता दिली होती. फायजरच्या लशीला सुरवातीच्या काळात १६ आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील लोकांना लस देण्याची परवानगी दिली होती.USA started vaccine testing for children

    आता फायजरने १२ पेक्षा कमी वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी हजारो मुले तयार झाली आहेत.फायजर कंपनीने १२ पेक्षा कमी वयोगटातील मुलांची कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी सुरू केली आहे.



    चाचणीसाठी अमेरिकेतील ९० राज्यातील ४५०० स्वयंसेवक तयार असल्याचे फायजर कंपनीने म्हटले आहे. ही चाचणी अमेरिकेबरोबरच फिनलँड, पोलँड, स्पेनमध्येही केली जाणार आहे. प्रारंभीच्या काळात स्वयंसेवकांना कमी प्रमाणात डोस दिला जाणार आहे.

    या आठवड्यात ५ ते ११ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. यात मुलांना प्रत्येकी दहा मायक्रोग्रॅमचे दोन डोस दिले जाणार आहेत. यानंतर सहा महिन्यांच्या बाळांचे लसीकरण काही आठवड्यानंतर सुरू होईल आणि त्यांना तीन मायक्रोग्रॅमची डोस दिली जाईल.

    USA started vaccine testing for children

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत

    Macron : मॅक्रॉन म्हणाले- रशिया हा युरोपच्या स्वातंत्र्यासाठी धोका; स्वातंत्र्यासाठी भीती निर्माण करणे आवश्यक