• Download App
    चीनचे आणखी एक षडयंत्र उघड : धोकादायक रसायने लावलेली खेळणी भारतासह अनेक देशांना पाठवली, अमेरिकेने जप्त केला माल|USA Seized Consignment Of Toys came From China, Use Of Chemical More Than Standards harmful for childrens

    चीनचे आणखी एक षडयंत्र उघड : धोकादायक रसायने लावलेली खेळणी भारतासह अनेक देशांना पाठवली, अमेरिकेने जप्त केला माल

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अवघ्या जगाला कोरोना महामारीच्या संकटात ढकलणाऱ्या चीनने आपली कुकृत्ये सुरूच ठेवली आहेत. आता चीनने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये राहणाऱ्या लहानग्यांना लक्ष्य केले आहे. चीन भारतासह विविध देशांमध्ये धोकादायक रसायनांचा थर लागलेली खेळणी पाठवत आहे,USA Seized Consignment Of Toys came From China, Use Of Chemical More Than Standards harmful for childrens

    ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्पारिणाम होत असल्याचे आढळले आहे. शुक्रवारी मोठी कारवाई करत अमेरिकेने चीनमध्ये बनवलेल्या अनेक खेळण्यांचा मोठा माल जप्त केला आहे. पकडलेली ही खेळणी भारतात खूप लोकप्रिय आहेत.



    शिसे, कॅडमियम, बेरियमचा अति वापर

    अमेरिकेने जप्त केलेल्या चिनी खेळण्यांच्या लॉटमध्ये शिसे, कॅडमियम, बेरियम यासारख्या रासायनिक पदार्थांचा जास्त वापर करण्यात आला आहे. 16 जुलै रोजी अमेरिकेने या खेळण्यांची प्राथमिक चाचणी केली, त्यानंतर त्यांना प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या खेळण्यांमध्ये मानकांपेक्षा जास्त रासायनिक पदार्थ वापरले गेले आहेत.

    अमेरिकेने जप्त केला चिनी माल

    अमेरिकेने चीनचे सात बॉक्स जप्त केले. हे सर्व खेळण्यांनी भरलेले आहेत. खेळण्यांच्या मालामध्ये ‘लगोरी 7 स्टोन’ गेमचे 295 पॅकेट्सदेखील आहेत. हा खेळ भारतात खूप लोकप्रिय आहे. त्याला भारतात पिट्टू किंवा सातोलिया म्हणतात. ऑनलाइन खेळणी खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

    USA Seized Consignment Of Toys came From China, Use Of Chemical More Than Standards harmful for childrens

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत