विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – अफगाणिस्तानच्या लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेने मागील दोन दशकांमध्ये तब्बल ८३ अब्ज डॉलर खर्च केले पण तेच सैन्य आणीबाणीची वेळ आली तेव्हा काही क्षणांत कोसळून पडले.
अफगाणिस्तानचे लष्कर एवढ्या कमी वेळेत तालिबान्यांना शरण कसे आले?USA defeated in Afganistan is very srious thing
हाच प्रश्नस अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना सतावतो आहे. इराकप्रमाणे येथे लष्करामध्ये लढण्याची जिद्द नव्हती. अमेरिकेला अफगाणिस्तानात स्थायी असे पोलिस दल आणि भक्कम लष्कर उभारण्यात अपयश आले. तालिबान्यांशी दोन हात करण्यासाठी अमेरिकेला स्थानिक पातळी भक्कम असे नेतृत्वही उभे करता आले नाही.परिणामी लष्कराला त्यांचा नेता मिळाला नाही, असे काही लष्करी विश्लेढषक सांगतात.
तालिबानने एकही गोळी न झाडता अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतली. तालिबानने केवळ राजकीय सत्ताच मिळविली नाही तर अमेरिकेने देऊ केलेला शस्त्रसाठा, दारूगोळा आणि हेलिकॉप्टर देखील ताब्यात घेतले आहे. एक लढाऊ विमान देखील आता तालिबान्यांच्या हाती आले आहे.
USA defeated in Afganistan is very srious thing
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरने झटका दिल्यावर आता फेसबुकचीही राहूल गांधींना नोटीस, इन्स्टाग्रामवरील ती पोस्ट त्वरित हटविण्याचे आदेश
- आंध्र प्रदेश सरकारची लपवालपवी, आता सरकारी आदेश, अध्यादेश वेबसाईटवर टाकणार नाही
- डाव्या आघाडीच्या राजकारणामुळे केरळमध्ये कोरोना वाढतोय, महिलांवरील हिंसाचार आणि दहशतवादाचे केंद्र बनतोय, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा हल्लाबोल
- तालीबानची सत्ता आल्यावर अफगाणी चलनात विक्रमी घसरण, मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नरही गेले पळून