विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : तालीबानी फौजने अफगणिस्थानवर ताबा मिळविला आहे. अध्यक्षही दुसऱ्या देशात पळून गेले आहेत. आता अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना जाग आली असून अफगणिस्थानमध्ये आणखी पाच हजार सैनिक पाठविण्याची घोषणा त्यांनी केली आहे. हे सैनिक प्रामुख्याने अमेरिकी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम करणार आहेत.US President Joe Biden will send 5,000 more troops after Taliban take control of Afghanistan
ज्यो बायडेन म्हणाले, अमेरिका आणि सहयोगी देशांच्या सैन्याला सुरक्षितपणे माघार घेता यावी यासाठी हे अतिरिक्त सैन्य पाठविण्यात येत आहे. बायडेन यांनी आपल्या अपयशाचे खापर आता माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर फोडले आहे. ट्रंप यांनी तालीबानशी करार केल्यानेच सैन्य माघारीचा निर्णय घ्यावा लागला असे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वीच तीन हजार सैनिक पाठविण्याची घोषणा बायडेन यांनी केली होती. आता त्यांनी म्हटले आहे की अमेरिकेच्या लष्कराला आणि गुप्तचर यंत्रणांना अफगाणिस्तानात रक्तपात होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर अमेरिकन किंवा मित्र राष्ट्राच्या सैनिकांना किंवा कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारचा धोका झाला तर त्याचे परिणाम वाईट होतील.
गेल्या वीस वर्षांपासून अमेरिकन सैन्य अफगणिस्थानात आहे. या काळात अनेक अफगाण नागरिकांनी अमेरिकन सैन्याला सहकार्य केले होते. बदला घेण्यासाठी तालीबान त्यांनाही धोका पोहोचविण्याची शक्यता आहे. या अफगाण नागरिकांनाही बाहेर काढण्यात येणार आहे.
दरम्यान ज्यो बायडेन यांच्या सैन्यमाघारीच्या निर्णयावर अमेरिकेत टीका होत आहे. रिपब्लिकन सिनेटर मिट रोमनी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेला अनेक वर्षे सहकार्य करणाऱ्यांना वाचविण्यासाठी कोणतीही प्रभावी निती आखण्यात आली नाही. त्यामुळे अमेरिकेची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे.
US President Joe Biden will send 5,000 more troops after Taliban take control of Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या
- लाईफ स्किल्स : चांगल्या बाबी आठवा. त्यातून मिळालेला आनंदाची पुन्हा अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा
- लष्करात आणि निमलष्करी दलात २८ हजार पदांची होणार भरती
- मनी मॅटर्स : तुमची सवय उधळपट्टीची की बचतीची, यावरच ठरते श्रीमंतीची वाटचाल
- स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास विरोध करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्थापनेनंतर प्रथमच केला स्वातंत्र्यदिन केला साजरा, पण तिरंगा फडकाविला चुकीच्या पध्दतीने