• Download App
    रशियावर इतिहासातील सर्वात कडक आर्थिक निर्बंध, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची घोषणा|US President Joe Biden announces toughest economic sanctions on Russia

    रशियावर इतिहासातील सर्वात कडक आर्थिक निर्बंध, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन: रशियाचे नेते व्लादिमीर पुतिन यांनी हे युद्ध निवडले आणि त्यांच्या कृतीचे परिणाम त्यांच्या देशाला भोगावे लागतील, असा इशारा देत रशियावर आजपर्यंच्या सर्वात कडक आर्थिक निर्बंधांची घोषणा केली आहे. रशियाला लक्ष्य करणाºया निबंर्धांच्या नवीन फेरीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी केली.US President Joe Biden announces toughest economic sanctions on Russia

    रशियन बँका आणि ूँ क्षेत्रांना लक्ष्य करते बिडेन म्हणाले की युनायटेड स्टेट्स आणि त्याचे सहयोगी चार मोठ्या रशियन बँकांची मालमत्ता ब्लॉक करतील आणि निर्यात नियंत्रणे लादतील. रशियाचे उद्योग आणि सेमीकंडक्टर आणि इतर हायटेक उत्पादनांवर परिणाम होणार आहे. रशियाच्या पेमेंट सिस्टीममध्येही अत्यंत कठोर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जगभरातील किंवा रशियाच्या ऊर्जा क्षेत्रात बँकेतून बँकेत पैसे हस्तांतरित होण्यावर निर्बंध येणार आहेत.



    रशिया युक्रेनवर हल्ला करणार ही भीती आम्ही व्यक्त केली होती आणि तसंच आता घडलं आहे. रशियाचा युक्रेनवरील हा हल्ला पूर्वनियोजित आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या हल्ल्याची व्यूहरचना आखली जात होती. युक्रेनचा यात काहीही दोष नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ठरवून हा हल्ला घडवून आणला आहे.

    आम्ही रशियाच्या या कृतीचा निषेध करत आहोत, असे बायडन म्हणाले. पुतीन यांच्याकडे चचेर्चा पर्याय खुला होता मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग अवलंबला आहे. याचे परिणाम त्यांना आणि त्यांच्या देशाला भोगावे लागतील. कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्यावर हल्ला करून तो देश काबीज करण्याची वृत्ती आम्ही मान्य करणार नाही.

    हे मनसुबे हाणून पाडण्यासाठी आम्ही रशियाविरुद्ध ठामपणे उभे राहू, असेही बायडन यांनी स्पष्ट केले. युक्रेनमध्ये आम्ही सैन्य पाठवणार नाही मात्र नाटो देशांच्या इंच इंच भूमीचे रक्षण करणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो, असे सूचक विधानही बायडन यांनी केले.

    अमेरिकेला निश्चितपणे या युद्धाची झळ बसणार आहे. सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देत आहोत, असे सांगताना युक्रेनवरील सायबर हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाणार, असा इशारा बायडेन यांनी दिला. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी सध्यातरी कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नसल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. रशियावरील आर्थिक निर्बंध आणखी वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली.

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी जी-७ देशांच्या नेत्यांसोबत डिजिटल बैठक सुरू केली. ‘जी-७ नेत्यांची बैठक सुरू झाली असून राष्ट्राध्यक्ष बायडन आणि इतर नेते राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या युक्रेनवरील हल्ल्याला त्यांच्या एकत्रित प्रतिसादावर चर्चा करत आहेत, असे व्हाइट हाऊसने सांगितले.

    US President Joe Biden announces toughest economic sanctions on Russia

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प इटलीच्या PM मेलोनींना भेटले; युरोपियन युनियनशी व्यापार कराराचे आश्वासन