• Download App
    अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिन परेडमध्ये गोळीबार : शिकागोत इमारतीच्या छतावरून हल्लेखोराने केला अंदाधुंद गोळीबार; 6 ठार, 31 जखमी|US Independence Day parade shooting Attacker indiscriminately fires from roof of Chicago building; 6 killed, 31 injured

    अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिन परेडमध्ये गोळीबार : शिकागोत इमारतीच्या छतावरून हल्लेखोराने केला अंदाधुंद गोळीबार; 6 ठार, 31 जखमी

    वृत्तसंस्था

    शिकागो : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी (4 जुलै) शिकागोमध्ये स्वातंत्र्य दिन परेडदरम्यान गोळीबार झाला. शिकागोच्या उपनगरातील इलिनॉय राज्यातील हायलँड पार्कमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.US Independence Day parade shooting Attacker indiscriminately fires from roof of Chicago building; 6 killed, 31 injured

    सकाळी 10 वाजता परेड सुरू झाली, मात्र 10 मिनिटांच्या गोळीबारानंतर ती थांबवण्यात आली. ते पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी स्थानिक लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने दुकानाच्या छतावरून अंदाधुंद गोळीबार केला. परिसराची नाकाबंदी करून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले- या निर्दयी हिंसाचाराने मला धक्का बसला आहे.



    हल्लेखोर 18 ते 20 वर्षांचा

    हायलँड पार्क सुरक्षा प्रमुख ख्रिस ओ’नील यांनी सांगितले की, पोलिस संशयित हल्लेखोराचा शोध घेत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर 18 ते 20 वर्षांचा तरुण आहे. त्याचा रंग गोरा असून केस लांब आहेत. त्याने पांढरा किंवा निळा टी-शर्ट घातला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक बंदूक जप्त केली आहे. लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे.

    हल्ल्यात मोठ्या शस्त्राचा वापर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिकागो सन-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, घटनास्थळी एक व्यक्ती जमिनीवर पडलेला होता. त्याचे शरीर ब्लँकेटने झाकलेले होते. त्याचवेळी सुमारे 5 ते 6 लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. माइल्स झेरेमस्की या स्थानिक रहिवाशाने मला सांगितले – मी 20 ते 25 शॉट्स ऐकले, जे एकामागून एक होत होते. त्यामुळे ती फक्त हँडगन किंवा शॉटगन असू शकत नाही. गेल्या वर्षीही स्वातंत्र्यदिनी गोळीबाराची घटना घडली होती, ज्यात 19 जणांना जीव गमवावा लागला होता.

    US Independence Day parade shooting Attacker indiscriminately fires from roof of Chicago building; 6 killed, 31 injured

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    russia : रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची टेस्ट केली; वेग 1300 kmph

    Bangladesh : बांगलादेशने ईशान्येकडील राज्यांना आपला भाग असल्याचे दाखवले; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानी जनरलना वादग्रस्त नकाशा भेट दिला

    US-China : अमेरिका-चीन ट्रेड डीलची फ्रेमवर्क फायनल; ट्रम्प-शी जिनपिंग भेटीपूर्वी निर्णय